Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi

Gavhachya Pithache Paushtik Veg Bom
Gavhachya Pithache Paushtik Veg Bom

गव्हाच्या पिठाचे पौष्टिक कुरकुरीत व्हेज बॉंम 

Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi

आपल्याला रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा तो प्रश्न पडतो तसेच तो नाश्ता पौस्टीक सुद्धा पाहिजे. अश्या प्रकारचा पौस्टीक नाश्ता आपण झटपट बनवू शकतो. किंवा जेवताना साईड डिश म्हणून सुद्धा आपण अश्या प्रकारचा नाश्ता बनवू शकतो.
गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवताना अगदी कमी तेलात बनवून त्यामध्ये गव्हाचे पीठ, रवा, व भाज्या वापरल्या आहेत. आपण चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.

The Marathi language video of this Gavhachya Pithache Paushtik Veg Bom can be seen on our YouTube Channel: Gavhachya Pithache Paushtik Veg Bom

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी

साहित्य:
1 कप गव्हाचे पीठ
½ कप रवा
2 टे स्पून दही
मीठ चवीने
2 टी स्पून तेल
1 छोटा कांदा (चिरून)
2 हिरव्या मिरच्या ½ “ आल 6 लसूण पाकळ्या (पेस्ट करून)
1 छोटा बटाटा (सोलून बारीक तुकडे करून)
1 छोटी शिमला मिरची (चिरून)
1 छोटेसे गाजर (चिरून)
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
½ टी स्पून इनो
तेल नाश्ता भाजण्यासाठी

Gavhachya Pithache Paushtik Veg Bom
Gavhachya Pithache Paushtik Veg Bom

कृती:

कांदा बारीक चिरून घ्या. शिमला मिरची, गाजर, चिरून घ्या. बटाटा सोलून बारीक चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
गव्हाचे पीठ, रवा, दही व थोडे पाणी मिक्स करून 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा.

एका नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्या मग त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून बटाटे घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेवा व दोन मिनिट शिजू द्या. मग झाकण काढून त्यामध्ये शिमला मिरची, गाजर घालून परत दोन मिनिट झाकण ठेवून शिजू द्या. मग झाकण काढून हळद, लाल मिरची पावडर, लिंबूरस, मीठ व कोथबिर घालून मिक्स करून घेऊन एक वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर विस्तव बंद करा व मिश्रण थंड करायला ठेवा.

मग भिजवलेल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात भाज्यांचे मिश्रण घालून मिक्स करून थोडे पाणी घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये इनो व त्यावर 2 चमचे पाणी घालून मिश्रण हळुवार पणे मिक्स करा.

आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावून त्यामध्ये 1 टे स्पून मिश्रण घालून बाजूनी थोडे तेल सोडा व त्यावर झाकण ठेवून 5-7 मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मग झाकण काढून व्हेज बॉंम उलट करून दुसऱ्या बाजूनी सुद्धा थोडेसे तेल घालून फ्राय करून घ्या.

गरम गरम व्हेज बॉंम टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.