Fitkari Che 7 Achuk Totke in Marathi

Fitkari Che Achuk Totke
Fitkari

फिटकरी चे अचूक प्रभावी टोटके धन प्राप्ति साठी

तुरटी म्हणजेच फिटकारी ही आपल्या परिचयाची आहे. त्यालाच इंग्लिश मध्ये Alam म्हणतात. तुरटीचे जसे आपले सौंदर्य, त्वचा, दात, केस आपला चेहरा ह्या साठी जशी फायदेशीर आहे तसेच तुरटीच्या टोटका केल्याने आपल्याला अपार धनप्राप्ती, कर्जापासून मुक्ती, घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, वाईट नजर, विचित्र स्वप्न व घरातील भांडण दूर करते.

तुरटीचा हा टोटका अगदी सोपा व सरळ आहे. कोणीसुद्धा करू शकतो. ह्या तोटक्याचे काहीही दूषपरिणाम नाहीत. उलट आपल्याला ह्यामुळे फायदेच होतात.

कोणताही टोटका करतांना श्रद्धेने करा त्यामुळे आपल्याला लगेच त्याची परीणाम दिसून येतात.

Fitkari Che Achuk Totke
Fitkari

धन प्राप्ती:
तुरटीचा एक तुकडा आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुरटीच्या पाण्याणी आंघोळ केली तर धन प्राप्ती होते. त्याच बरोबर एका काळ्या रंगाच्या कापडात तुरटीचा एक तुकडा बांधून आपल्या घराच्या मेनडोर म्हणजेच मुख्य दरवाजावर किंवा दुकान किंवा ऑफिसच्या दरवाजावर बांधून ठेवला तर आपल्याला धनप्राप्ती होण्यास सुरवात होते.

कर्जापासून मुक्ती:
जर तुम्ही दुसर्‍याचे देणे लगता किंवा आपल्याला कर्ज झाले आहे तर तीन बुधवार आपण हा तोटका करून आपल्या कर्जातून मुक्त हौऊ शकता. बुधवार सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुरटीचा एक तुकडा व थोडेसे कुंकु (सिंदूर) एका खायच्या पानात ठेवून मुडपून घेवून वरतून दोर्‍यानी बांधून घ्या. मग पिंपळाच्या झाडाखाली छोटा खडा करून पुरून ठेवा.

घरातील नकारात्मक ऊर्जा:
तुरटीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एका बाउलमध्ये तुरटीचा एक तुकडा आपल्या घ्ररातील बाथरूम मध्ये कोणालाही दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

वास्तुदोष:
आपण ज्या घरात राहतो त्या घरात कधी वास्तु दोष असतो त्यामुळे आपली काही कामे होत नाहीत किंवा सारख्या अडचणी येतात. तेव्हा घरात प्र्तेक खोली मध्ये तुरटीचा एक तुकडा ठेवा त्यामुळे वास्तुदोष निघून जाईल.

वाईट नजर:
जर व्यक्तीला कोणाची वाईट नजर लागली असेलतर तुरटीचा उपयोग करु शकता. आपल्याला फक्त तुरटीचा एक तुकडा घेवून नजर लागलेल्या व्यक्तीवरून सात वेळा गोलाकार फिरवून लगेच विस्तवावर जाळून टाका. तुरटी पूर्ण जळल्या जळल्या वाईट नजर निघून जाईन.

भयानक किंवा विचित्र स्वप्न:
जर आपल्याला भीती मुळे विचित्र स्वप्न पडत असतील तर रात्री झोपताना उश्याच्या खाली किंवा बेडच्या खाली एका काळ्या रंगाच्या कापडात एक तुरटीचा तुकडा गुंडाळून ठेवावा. असे केल्याने वाईट स्वप्न पडणे बंद होईल. त्याच बरोबर मंगळवारी किंवा रविवारी रात्री डोक्याच्या खाली तुरटीचा तुकडा ठेवावा.

घरातील भांडणे:
जर घरातील व्यक्तिमधे भांडणे किंवा काही टेंशन असतील तर रात्री झोपताना आपल्या बेडच्या जवळ एक ग्लासमध्ये पाणी घेवून त्यामध्ये तुरटीचा तुकडा घालून ठेवावा. सकाळी उठल्यावर ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. अश्याने आपल्या घरातील व्यक्तिमधील संबंध सुधारतील व वातावरण छान राहील.

The Marathi language video of these Fitkari/Turti/Alum Remedies can be seen here – Fitkari Che Achuk Dhan Prapti Va Itar Totke

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.