तवा गार्लिक बटर नान बिना यीस्ट बिना ओव्हन
आपण घरच्या घरी अगदी हॉटेल सारखे बटर नान बनवू शकतो. बटर नान बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत. आपण हॉटेल मध्ये गेलो की भाजी बरोबर छान कुरकुरीत गरमा गरम बटर नान ऑर्डर करतो. बटर नान आपण घरी सुद्धा अगदी भट्टी सारखे बिना ओव्हन आपल्या गॅस स्टोववर सुद्धा बनवू शकतो.
बटर नान बनवतांना आपण यिस्ट न वापरता सुद्धा बनवू शकतो. तसेच गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा अगदी छान नान बनवता येतात. तसेच आपल्याला वरतून त्याला छान सजवून सुद्धा बनवता येतात. मी बटर नान बनवतांना वरतून गार्लिक सिसेम तीळ व कोथबिर वापरली आहे त्यामुळे ते खूप आकर्षक दिसतात व टेस्टी सुद्धा लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
2 कप मैदा, 1 कप गव्हाचे पिठ
1 टी स्पून बेकिंग सोडा
1/2 टी स्पून साखर
1 टी स्पून मीठ
1 टी स्पून तेल, 1 कप दही
![Make Garlic Naan without Yeast and Oven](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2020/01/Make-Garlic-Naan-without-Yeast-and-Oven-300x180.jpg)
कृती:
एका बाऊलमध्ये मैदा, गव्हाचे पिठ, मीठ, साखर व बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये तेल घालून मिक्स करून दही घालून परत चांगले मिक्स करा. थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठ मळल्यावर त्यावर तेलाचा हात लावून 30 मिनिट पिठ झाकून ठेवा.
पिठ चांगले मुरल्यावर परत चांगले मळून घ्या. मग एक सारखे गोळे बनवून लाटून घ्या. एक गोळा लाटून झाल्यावर त्यावर काळे व पांढरे तीळ, चिरलेली कोथबिर, व चिरलेले लसूण घालून वरतून हळुवारपणे लाटणे फीरवावे.
नॉनस्टिक तवा गरम करून घ्या. लाटलेल्या नानला दुसर्या बाजूनी अगदी थोडेसे पाणी लावून घ्या. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाका मग तव्यावर एक मिनिट झाकण ठेवून नान भाजून घ्या. झाकण काढून नान उलट करून घ्या. दुसर्या बाजूनी सुद्धा भाजून घ्या. नान दोनी बाजूंनी भाजून झाल्यावर वरतून बटर किंवा तूप लावून गरम गरम नान भाजी बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Naan recipe can be seen here – How to Make Garlic Naan/Bread at home without yeast and owen