Rajasthani Besan Gatte Ki Sabzi Recipe in Marathi

राजस्थानी बेसन गट्टे का साग किंवा भाजी: राजस्थान मधील ही एक पारंपारिक लोकप्रिय डिश आहे. ही भाजी छान खमंग चमचमीत लागते. घरात कधी भाजी नसेलतर अश्या प्रकारची निराळी भाजी बनवता येते.

गट्टे म्हणजे बेसन पासून बनवतात व ते उकडून फ्राय करून त्याची भाजी बनवतात. आपल्या घरी कोणी अचानक पाहुणे आलेतर अश्या प्रकारची भाजी बनवतात येते

राजस्थानी भाज्या ह्या फार तिखट किंवा मसालेदार नसतात त्यामुळे लहान मुले सुधा आवडीने खातात. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा ऑफिसमध्ये जातांना टिफीनमध्ये न्यायला पण मस्त आहे.

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य: गट्टे बनवण्यासाठी
१ १/२ कप बेसन (डाळीचे पीठ)
२ टी स्पून धने-जिरे पावडर एक चिमुट सोडा
१/२ टी स्पून हिंग
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
२ टे स्पून तेल (कडकडीत मोहन)

भाजी करीता:
२ मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
२ मध्यम आकाराचे टोमाटो (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर (किंवा चवीने)
२ कप पाणी
मीठ चवीने

फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
१/२ कप सुके खोबरे (किसून)
१/२ कप कोथंबीर (चिरून)

Rajasthani Besan Gatte Ki Sabzi Recipe

Besan Gatte Ki Sabzi

कृती:गट्टे बनवण्यासाठी:
प्रथम एका बाउलमध्ये बेसन, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर, अन चिमुट खायचा सोडा, हिंग, मीठ, कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून त्याचे लांबट आकाराचे उंडे बनवावे.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बनवलेले उंडे घालून झाकण ठेवून १०-१२ मिनिट उंडे उकडून घ्यावे. मग पाणी काढून उंडे चाळणीवर थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या कापाव्या.

एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून बेसनचे गट्टे बनवण्यासाठी घालून मिक्स करून ५-७ मिनिट छान खरपूस भाजून घ्या. मग त्यामध्ये किसलेले खोबरे घालून एक मिनिट परतून कोथंबीर घालून मिक्स करून भांडे खाली उतरवून घ्या.

साग किंवा भाजी करीता:
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा व टोमाटो घालून २-३ मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ व २ वाट्या पाणी घालून उकळी आली की त्यामध्ये फ्राय केलेले बेसनचे गट्टे घालून कढईवर झाकण ठेवा व भाजी ४-५ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या.

गरम गरम चपाती, पराठा किंवा पुरी बरोबर गट्टे का साग किंवा भाजी सर्व्ह करा.

The Marathi language video of this Traditionaal and Authentic Rajasthani Besan Gatte Ki Sabzi can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=5VVhx6Lt40c

About Sujata Nerurkar (2176 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

2 Comments on Rajasthani Besan Gatte Ki Sabzi Recipe in Marathi

  1. Gitika Singh // June 7, 2019 at 10:17 am // Reply

    Great recipe for Besan Ke Gatte, will try this at home, thanks

  2. Surbhi Rana // June 7, 2019 at 9:55 pm // Reply

    Very useful recipe, I was searching for this recipe and found the one given by you as the most simple and easy to implement.
    Keep up the good work.

Leave a comment

Your email address will not be published.


*