Healthy Ayurvedic Tea Recipe in Marathi

आयुर्वेदिक टी: अश्या प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. आयुर्वेदिक टी हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली तर आपले शरीर आतून व बाहेरून निरोगी राहू शकते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल. व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.धने-जिरे व बडीशेप ह्यामध्ये असे गुणधर्म आहेत की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यात सुद्धा मदत मिळेल. अजून ह्याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते.

बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ जणासाठी

साहित्य:
२ कप पाणी
१/४ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून धने
१/४ टी स्पून बडीशेप

 Ayurvedic Tea

Healthy Ayurvedic Tea

कृती:
एका भांड्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाले की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिट गरम करायला ठेवा. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (2057 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*