Hyderabadi Bharli Karli Recipe in Marathi
चमचमीत हैद्राबाद पद्धतीची भरली कारली: कारली म्हटले की आपल्याला वाटते कारले हे कडू व त्याची भाजी सुद्धा कडूच असेल. कारलेहे आपल्या शरीरासाठी हितावह आहे. कडूपणा हा कार्ल्याचा गुणधर्म आहे. कारल्याची भाजी खूप चवीस्ट लागते.
कारल्यामध्ये जीवनसत्व “ए” व “सी” आहे. तापामध्ये मुद्दामून कारल्याची भाजी देतात त्यामुळे तोंडाला चवपण येते.
The English language of the preparation this Karela dish can be seen here – Hyderabadi Bharwan Karela
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: ६ मध्यम आकाराची ताजी कारली
सारणासाठी मसाला:
१/४ कप बडीशेप
१ कप सुक्या खोबऱ्याच्या कीस
२ टे स्पून धने
१/२” दालचीनी तुकडा
६ लवंगा २ टी स्पून जिरे
५-६ बदाम १ टे स्पून तीळ
२ टे स्पून चिंचेचा कोळ
४ लाल मिरच्या
१/४ टी स्पून हळद
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ व गुळ चवीने
१/२ कप तेल

Bitter Gourd
कृती:
कारली स्वच्छ धुवून मध्ये एक चीर द्यावी. पण चीर देतांना दोनी टोके कापली नाही गेली पाहिजे कारण आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरावयाचा आहे. कारल्याला मध्ये चीर दिल्यावर त्यामधील बिया काढून घेऊन कारली उकडून घेऊन बाजूला ठेवावीत.
सारणाचा मसाला भरण्यासाठी: सुक्या खोबऱ्याचा कीस, बडीशेप, तीळ, धने, जिरे, बदाम थोडे भाजून घ्या. मग त्याच तव्यावर लाल मिरची, लवंग, दालचीनी गरम करून घ्यावी व सर्व मसाला मीठ व हळद घालून बारीक वाटुन घ्यावा. वाटलेला मसाला उकडलेल्या कारल्यात भरावा.
नॉन स्टिक भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये भरलेली कारली ठेऊन झाकण ठेवून मंद विस्तवावर दोन वाफा येऊ द्याव्यात मग झाकण काढून चिंचेचे कोळ, गुळ व एक कप पाणी घालून दोन-तीन वाफा आल्यावर कोथंबीर घालून भाजी खाली उतरवावी.
गरम गरम भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
Leave a comment