टोमाटो सेब चटणी: टोमाटो सफरचंद चटणी ही एक जेवणातील टेस्टी चटणी आहे. बनवायला सोपी, लवकर होणारी व व चवीला वेगळी अशी आहे. जर सफरचंद मऊ झाली असतील तर त्याचा उपयोग चटणी बनवण्यासाठी करा.
The English language version of this Chutney recipe and its preparation method can be seen here – Apple and Tomato Chutney
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ६ जणासाठी
साहित्य:
४ मध्यम आकाराचे टोमाटो
३ मध्यम आकाराचे सफरचंद
४ पाकळ्या लसूण
१ कप साखर
१/४ टी स्पून मोहरी
२ लहान आकाराचे कांदे
मीठ चवीने
![Tomato Apple Chutney](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2016/09/टोमाटो-सफरचंद-चटणी-300x230.jpg)
कृती:
लसूण व मोहरी बारीक वाटून घ्या. टोमाटो , कांदा बारीक चिरून घ्या. सफरचंद सोलून चिरून घ्या.
एका कढईमधे वाटलेले लसूण, चिरलेला टोमाटो, कांदा, सफरचंद साखर मीठ घालून मिक्स करून चांगले शिजवून घ्या.