डिंकांचे लाडू : डिंकांचे लाडू हे बीन पाकाचे आहेत. हे लाडू नेहमी थंडीच्या दिवसात करतात. तसेच बाळंतीणीसाठी साठी करतात. ज्याची प्रकृती अशक्त आहे त्यांना हे लाडू खूप फायदेशीर आहेत. ह्याला पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल.
साहित्य :
३ कप खारीक पावडर
३ कप सुके खोबरे कीस
२ कप डिंक
१/२ कप खसखस
२ कप तूप
१/२ कप काजू-बदाम कुटून
१/४ किसमिस
१/२ टी स्पून जायफळ
१ टी स्पून वेलचीपूड
४ कप गुळ किंवा ४ कप पिठीसाखर (किंवा आपल्याला जसे गोड कमी किंवा जास्त आवडत असेल तशी साखर अथवा गुळ वापरावे.
कृती : खारीक पावडर थोडी भाजून घ्या. सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून हातांनी कुस्करून घ्या. डिंक तळून त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्या. खसखस भाजून कुटून घ्या. तूप वितळवून घ्या. गुल किसून घ्या.
एका परातीत खारीक पावडर, सुके खोबरे, डिंक, खसखस, तूप, काजू-बदाम कुट, किसमिस, जायफळ, वेलची पूड , गुळ किंवा पिठीसाखर घालून चांगले मिक्स करून त्याचे लाडू वळावेत. सजावटीसाठी लाडू खोबऱ्याच्या किसात व तळलेल्या बारीक साबुदाण्यात घोळा म्हणजे अजून छान दिसतील.
The English language version of the Dinkache Ladoo recipe is published in this – Article