खारी बाईट हा पदार्थ आपल्याला स्टारर्र म्हणून करता येईल. लहान मुलांना खूप आवडेल. ह्यामध्ये लाल, पिवळी हिरवी सिमला मिर्च वापरल्याने रंग पण छान येतो. संध्याकाळी चहा बरोबर पण चांगला लागतो.
खारी बाईट हे लहान आकाराच्या खारी पासून बनवले आहे. लहान खारी ही बाजारात सहजपणे मिळते. हा एक नवीन पकार आहे. ह्या मध्ये पांढरा सॉस व त्याबरोबर रंगीत भाज्या वापरल्या आहेत. त्यामुळे दिसायला पण आकर्षक दिसतात. तसेच चीज वरतून घातले आहे त्यामुळे टेस्ट पण चांगली लागते. टोमाटो सॉस वापरला आहे त्यामुळे छान आंबट-गोड चव पण येते. चीज खारी बाईट घरी बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. हा एक चांगला पदार्थ आहे.
For the English Version Khari Bites Preparation see this – Article.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १० खारी
साहित्य :
१० खारी
१ टी स्पून तेल
वरील आवरणा साठी :
१ कप पांढरा सॉस
१/२ टे स्पून बटर
१/४ कप कांदा (बारीक चिरून)
१ टी स्पून लसून (बारीक चिरून)
१ टी स्पून हिरवी मिरची (बारीक चिरून)
१ कप लाल
हिरवी
पिवळी सिमला मिरची (चिरून
१ चीज क्यूब (किसून)
१ टे स्पून बीटरूट (थोडे उकडून व किसून)
टोमाटो सॉस व मिरी पावडर सजावटी साठी
कृती : एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा, लसून, हिरवी मिरची दोन मिनिट फ्राय करून मग त्यामध्ये सिमला मिर्च मिक्स करून २-३ मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये पांढरा सॉस मिक्स करून बीटरूट मिक्स करा. प्रत्येक खारी वर एक-एक टे स्पून मिश्रण ठेवून त्यावर थोडे थोडे किसलेले चीज पसरून मिरी पावडर टाका.
नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा त्यावर तेल लावून ख्रारी ठेवा वरतून झाकण ठेवा व दोन मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. सॉस बरोबर सर्व्ह करा.