Upvasacha Batata Chivda Recipe in Marathi

उपवासाचा बटाट्याचा चिवडा: उपवासाचा बटाट्याच्या चिवडा हा घरी बनवता येतो. हा चिवडा चवीला स्वादीस्ट लागतो. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे किसून पाण्यात घालून त्यामध्ये १/४ टी स्पून सोडा घालावा त्यामुळे बटाट्याचा कीस हलका होतो.

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ किलो बनतो

साहित्य:
८ मोठ्या आकाराचे बटाटे
१ कप शेगदाणे
१/४ कप काजू तुकडा
१/२ कप बेदाणे
१/२ कप पिठीसाखर
मीठ चवीने
तूप चिवडा तळण्यासाठी
फोडणी करीता:
२ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
६-७ हिरव्या मिरच्या

Aloo Ka Chivda

Upvasacha Batata Chivda

कृती:
बटाटे धुऊन, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडा घालून किसलेला बटाट्याचा कीस घालून हलवून पाणी काढून टाका. मग बटाट्याचा कीस स्वच्छ कापडावर ५-१० मिनिट पसरवून ठेवा. शेगदाणे भाजून व सोलून घ्या. हिरव्या मिरच्याचे तुकडे कापून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बटाट्याच्या कीस गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून घेऊन पेपरवर ठेवा. मग भाजलेले शेगदाणे, बेदाणे व काजू तळून घ्या. मग सर्व मिक्स करून घ्या.
फोडणी साठी तूप गरम करून घेऊन त्यामध्ये जिरे व हिरव्या मिरच्या घालून मिक्स करून फोडणी तळलेल्या कीसावर घालून मिक्स करून घ्या. मग वरतून मीठ व पिठीसाखर घालून हातानी मिक्स करून घ्या. चिवडा थंड झालाकी डब्यात भरून ठेवा.

About Sujata Nerurkar (1984 Articles)

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*