Baked Cheese Corn Recipe in Marathi

बेक्ड चीज कॉर्न: बेक्ड चीज कॉर्न ही डीश ताज्या स्वीट कॉर्नच्या दाण्या पासून बनवली आहे. ही डीश बनवतांना व्हाईट सॉस बनवून त्यामध्ये चीज घालून उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे घालून वरतून परत किसलेले चीज घालून ओव्हनमध्ये १०-१२ मिनिट बेक केले आहे. बेक्ड चीज कॉर्न ही डीश नुसती खायला किंवा ब्रेड बरोबर सुद्धा सर्व्ह करायला छान आहे.

The English language version of the same Baked Cheese dish can be seen here – Baked Corn in White Cheese Sauce

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेकिंग करण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप स्वीट कॉर्नचे दाणे
१ चीज क्यूब
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
१ टी स्पून बटर
३ कप व्हाईट सॉस

(व्हाईट सॉस बनवण्यासाठी:
२ टे स्पून बटर
२ कप दुध
२ टे स्पून मैदा
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने)

Tasty Baked Cheese Corn

Baked Cheese Corn

कृती: स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घ्या. चीज किसून घ्या.

पांढरा सॉस बनवण्यसाठी: एक कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये मैदा घालून मंद विस्तवावर एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दुध घालून घट्ट होई परंत हलवत रहा. मग त्यामध्ये मीठ व किसलेले चीज घालून मिक्स करा.

पांढरा सॉस तयार झाल्यावर त्यामध्ये उकडलेले कणसाचे दाणे, थोडेसे मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करून चीज कॉर्न तयार झाले.
बेकिंग ट्रेला बटर लाऊन त्यामध्ये चीज कॉर्न घालून वरतून किसलेले चीज घालून सजवा.

ओव्हन प्रीहीट करून घ्या मग ओव्हनमध्ये बेकीग ट्रे ठेवून १०-१२ मिनिट १००-१२० डिग्रीवर बेक करा किंवा चीजचा रंग बदले परंत बेक करा.

गरम गरम बेक्ड चीज कॉर्न सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1968 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*