Khamang Shengdana Thecha Recipe in Marathi

खमंग शेंगदाणा ठेचा: महाराष्ट्रामध्ये शेगदाणे चटणी ही लोकप्रिय आहे. तसेच शेंगदाण्याचा ठेचा हा सुद्धा लोकप्रिय आहे. महाराष्टातील गाव खेड्या मध्ये भाकरी बरोबर शेगदाणे ठेचा व कच्चा कांदा खायची पध्दत आहे. शेंगदाणे ठेचा खूप छान खमंग व चवीस्ट लागतो. हा ठेचा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. हा ठेचा २-३ दिवस छान टिकतो.

The English language version of the same Thecha recipe and its preparation method can be seen here – Spicy Shengdanyacha Thecha

बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ कप शेंगदाणे
७-८ हिरव्या ताज्या मिरच्या
१०-१२ लसूण पाकळ्या
१ टी स्पून जिरे
मीठ चवीने
१ टे स्पून तेल

 Shengdana Thecha

Khamang Shengdana Thecha

कृती:
हिरव्या मिरच्या धुवून, पुसून चिरून घ्या. लसूण सोलून ठेचून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण घालून चांगले परतून घ्या. मग त्यामध्ये चवीने मीठ घालून पाट्यावर किंवा दगडी मध्ये जाडसर वाटुन घ्या.
शेंगदाणे ठेचा हा भाकरी किंवा चपाती बरोबर छान चवीस्ट लागतो.

About Sujata Nerurkar (1932 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*