Chinese Paneer Lollipop Sticks Recipes in Marathi

चायनीज पनीर लाली पॉप स्टीक्स: चायनीज पनीर लाली पॉप स्टीक्स ह्या जेवणाच्या आगोदर स्टारटर म्हणून किंवा जेवणात साईड डीश म्हणून सुद्धा बनवायला छान आहेत. तसेच नाश्त्याला सुद्धा बनवायला छान आहे. ह्या पनीर स्टीक्स बनवतांना पनीर, उकडलेला बटाटा, तसेच सोया सॉस वापरलेला आहे त्यामुळे ह्याची चव चांगली लागते. पनीर लालीपॉप लहान मुलाच्या पार्टीला किंवा पार्टीला बनवायला छान आहेत.

The English language version of the same Paneer Snack recipe and its preparation method can be seen here – Chinese Paneer Lollipop Sticks

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १०-१२ लालीपॉप

साहित्य:
२ मोठे बटाटे (उकडून, सोलून, किसून)
१ कप पनीर (किसून)
१ टे स्पून आले-लसूण (चिरून)
२-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ टी स्पून सोया सॉस
१ टे स्पून कॉर्नफ्लोर
२ ब्रेड स्लाईस (ब्रेड क्रम)
१/२ टी स्पून पांढरी मिरे पावडर
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
१ छोटा कांदा (चिरून)
मीठ चवीने
तेल पनीर स्टीक्स तळण्यासाठी
२ टे स्पून मैदा

Paneer Lollipop Sticks

Chinese Paneer Lollipop Sticks

कृती:
बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या. पनीर किसून घ्या.
उकडलेले बटाटे, पनीर, आले-लसूण-हिरवी मिरची, कोथंबीर, ब्रेडक्रम , सोया सॉस, कॉर्नफ्लोर, पांढरी मिरी पावडर, मीठ घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या पीठाचे एक सारखे लांबट आकाराचे ८-१० गोळे बनवून घ्या.
मध्यम आकाराच्या कढईमधे तेल गरम करून घ्या. एक एक गोळा घेऊन मैद्यामध्ये घोळवून गरम तेलात सोडून मंद विस्तवावर कुरकुरीत तळून घ्या.
पनीर लालीपॉप सर्व्ह करतांना त्यामध्ये आईसक्रिम स्टिक लाऊन टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1850 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*