Crispy Paneer Sticks Recipe in Marathi

पनीर स्टीक्स: पनीर स्टीक्स ही एक स्टारटरची डीश आहे. आपण जेवणात किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पनीर स्टीक्स छान टेस्टी लागतात तसेच बनवतांना पनीरच्या लांबट स्टिक कापल्या आहेत व वरतून उकडलेल्या बटाट्याचे आवरण लावले आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा कीटी पार्टीला बनवायला चागले आहे.

The English language version of this Paneer Snack recipe and preparation method can be seen here – Paneer Sticks

बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: ८-१० स्टिक

साहित्य:
१५० ग्राम पनीर (८-१० तुकडे) लांबट आकारामध्ये कापा)

१) आवरणासाठी:
७-८ बटाटे (उकडून)
२ लहान कांदे (बारीक चिरून)
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
२ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून गरम मसाला
२ टे स्पून लिंबूरस
१/२ कप कोथंबीर (बारीक चिरून)
२ ब्रेड स्लाईस
मीठ चवीने

२) आवरणासाठी:
१/२ कप मैदा
२ कप ब्रेडचा चुरा
तेल पनीर स्टीक्स तळण्यासाठी

Crispy Paneer Sticks Kebab

Crispy Paneer Sticks

कृती:
पनीरचे लांबट आकाराचे ८-१० तुकडे करून घ्या.
बटाटे उकडून सोलून किसून घ्या. कांदे, कोथंबीर बारीक चिरून घ्या. बटाट्यामध्ये चिरलेला कांदा, कोथंबीर, आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या गरम मसाला, लिंबूरस, मीठ, ब्रेडचे स्लाईस थोड्याश्या पाण्यात भिजवून लगेच ब्रेड मधील पाणी दाबून काढा व उकडलेल्या बटाट्यामध्ये घालून एक सारखे मळून घ्या. मग मळलेल्या मिश्रणाचे ८-१० एक सारखे गोळे बनवा. प्रतेक गोळ्यामध्ये एक पनीर स्टिक घालून गोळा बंद करा. अश्या प्रकारे सर्व पनीर स्टिक बनवून घ्या.
एका बाऊलमध्ये १/२ कप मैदा व १/२ कप पाणी घालून मिक्स करा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये ब्रेडचा चुरा घ्या. एक एक पनीर स्टिक घेऊन प्रथम मैद्याच्या घोळा मध्ये बुडवा मग ब्रेडच्या चुरामध्ये घोळून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये पनीर स्टिक छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम पनीर स्टीक्स टोमाटो सॉस बरोबर किंवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1968 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*