Spicy Green Chutney for Batata Vada Recipe in Marathi

बटाट्या वड्याची चटणी: ही चटणी बटाटेवडा, मेदुवडा, डोसा ह्या पदार्था बरोबर छान लागते. बटाट्या वड्याची चटणी ही खमंग लागते. ही चटणी बनवतांना ओला नारळ, शेगदाणे, कोथंबीर वापरली आहे व वरतून फोडणी दिली आहे. त्यामुळे छान खमंग लागते.

The English language version of the Batata Vada Chutney recipe and preparation method can be seen here – Green Chutney for Batata Vada

बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१/२ कप ओला नारळ (खोऊन)
५-६ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर
४-५ लसूण पाकळ्या
२ टे भाजलेले दाणे
१ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने

फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
५-६ कडीपत्ता पाने
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग

Chutney for Batata Vada

Spicy Green Chutney for Batata Vada

कृती:
शेंगदाणे भाजून, सोलून घ्या. नारळ खऊन घ्या. कोथंबीर धुऊन चिरून घ्या.
नारळ, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, लसूण, शेंगदाणे, लिंबूरस, मीठ, साखर व २ टे स्पून पाणी घालून वाटून घ्या.
चटणी वाटून घेतल्यावर एका भांड्यात काढून घ्या.
फोडणीच्या वाटी मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कडीपत्ता, मोहरी व हिंग घालून खमंग फोडणी चटणीवर घालावी.

About Sujata Nerurkar (1895 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*