Tikhat Matarchi Chutney Recipe in Marathi

मटारची चटणी: मटारची चटणी ही दिसायला फार छान दिसते तसेच चवीलापण चांगली लागते. मटारची चटणी बनवतांना मटार ताजे वापरावेत म्हणजे चटणी चवीस्ट लागते. ह्यामध्ये शेगदाणे, चिंच-गुळ, वापरले आहे. मटार, दाणे व हिरव्या मिरच्या तेलावर परतून घेतल्यामुळे चटणी खमंग लागते.

The English language version of this Marat Chutney recipe and its preparation method can be seen here – Spicy Green Peas Chutney

बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप मटारचे दाणे
१ कप शेंगदाणे
३-४ हिरव्या मिरच्या
गुळ व मीठ चवीने
१ टी स्पून तेल
१ टे स्पून कोथंबीर
१ टी स्पून लिंबूरस

फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे

Spicy Green Peas Chutney

Tikhat Matarchi Chutney

कृती: एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मटारचे दाणे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, गुळ, मीठ घालून खमंग परतून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटलेली चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे घालून फोडणी चटणीवर घाला. मग त्यामध्ये कोथंबीर, लिंबूरस घालून मिक्स करून घ्या.

About Sujata Nerurkar (1895 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*