Rice Roll Pakore Recipe in Marathi

राईस रोल पकोड़े: राईस रोल पकोड़े हे नाश्त्याला किंवा जेवणामध्ये बनवता येतात. कधी कधी आपला भात जास्त होतो व उरतो व त्याचे काय करायचे तर फोडणीचा भात पण नेहमी नेहमी तेच तेच करून कंटाळा येतो तर अश्या प्रकारचे रोल बनवावेत. हे रोल चवीला फार स्वादीस्ट लागतात. राईस रोल बनवतांना उरलेला भात, मसूर डाळ, हिरवी मिरची, आले, ब्रेड क्रम, कोथंबीर लिंबूरस, उकडलेला बटाटा वापरला आहे. राईस रोल छान कुरकुरीत होतात.

The English language version of the recipe and preparation method of this Pakora can be seen here – Chawal-Masur Ke Pakode

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप शिजवलेला भात
१ कप मसूर डाळ
२ मध्यम बटाटे
४ हिरव्या मिरच्या
१/२” आले
२ ब्रेड स्लाईस
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल रोल तळण्यासाठी

Crispy Rice Roll Pakode

Rice Roll Pakore

कृती:
बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मसूरची डाळ शिजवून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. हिरवी मिरची-आले वाटुन घ्या. ब्रेड मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्या.
एका प्लेटमध्ये शिजवलेला भात, शिजवलेली मसूरडाळ, किसलेले बटाटे, हिरवी मिरची-आले पेस्ट, ब्रेड क्रम, लिंबूरस, मीठ घालून मिश्रण मळून घ्या. मग मिश्रणाचे एक सारखे १२ रोल बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हे रोल गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम रोल टोमाटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1928 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*