Pudina Puri Recipe in Marathi

पुदिना पुरी: पुदिन्याची पुरी नाश्त्याला बनवता येईल. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला ह्या पुऱ्या छान आहेत. मिंट म्हणजे पुदिना पुरी बनवतांना पुदिना व कोथंबीर वापरली आहे. पुदिना व कोथंबीर किती पौस्टीक आहे हे आपण कोथंबीर व पुदिन्याचे औषधी गुणधर्म ह्या लेखात वाचलेच असेल. ह्या पुऱ्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत.

The English language version of this Stuffed Poori recipe preparation method can be seen here – Mint Stuffed Puri

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: १२ पुऱ्या बनतात

साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१/४ कप कोथंबीर
१/४ कप पुदिना पाने
१ टी स्पून लाल मिरची पावडर
३-४ हिरव्या मिरच्या
५ लसूण पाकळ्या
१/२” आले तुकडा
१ टे स्पून गरम तेल
मीठ चवीने
तेल पुरी तळण्यासाठी

Mint Poori

Pudina Puri

कृती: गव्हाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, मीठ, गरम तेल मिक्स करून घ्या. कोथंबीर, पुदिना पाने, आले, लसूण, हिरवी मिरची वाटुन घेऊन पीठामध्ये मिक्स करून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ १० मिनिट बाजूला ठेऊन त्याचे एक सारखे गोळे बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून पुऱ्या छान तळून घ्या.
गरम गरम पुऱ्या टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1893 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*