Tripuri Purnima 2026: Moon Arghya Shubh Muhurat, Chandra Dosh Remedies & Dev Diwali Puja
24 नोव्हेंबर त्रिपुरी पौर्णिमा! चंद्राला अर्घ्य देण्याची शुभ वेळ, कुंडलीतील चंद्रदोष दूर करण्याचे उपाय
24 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी कार्तिक पूर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पूर्णिमा आहे ह्याच दिवशी देवदिवाळी सुद्धा आहे. हा दिवस अत्यंत धार्मिक व महत्वाचा आहे. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान, दान, दीपदान व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा करून चंद्र देवाची आराधना करण्याचे विशेष महत्व आहे.
हिंदू पंचांग अनुसार पूर्णिमा तिथी चे विशेष महत्व आहे. संपूर्ण वर्षात 12 पूर्णिमा येतात त्यामध्ये कार्तिक पूर्णिमा अत्यंत पुण्यदायी मनाली जाते. धार्मिक मान्यता अनुसार देवउठणी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु चार महिन्या नंतर योगनिद्रा मधून जागे होतात मग कार्तिक पूर्णिमा साजरी केली जाते. 24 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी कार्तिक पूर्णिमा आहे. ह्या दिवशी स्नान, दान, दीपदान व भगवान विष्णु ह्यांची पूजा करून चंद्र देवाची पूजा आराधना करण्याचे विशेष महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होते.
ज्योतिष मान्यता अनुसार, पूर्णिमा ह्या दिवशी रात्री चंद्राला अर्ध्य दिल्याने मानसिक शांती प्राप्त होते व कुंडली मधील चंद्र संबंधित अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते. आता आपण पाहू या कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी चंद्रोदय वेळ, चंद्रमाला जल अर्पित करण्याची शुभ वेळ व त्यापासून मिळणारे धार्मिक व ज्योतिषीय लाभ काय होतात.
कार्तिक पूर्णिमा 2026 चंद्रोदय व अर्ध्य देनेची वेळ:
चंद्रोदय वेळ: 24 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 04:56 मिनिट
सूर्यास्त वेळ: 24 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 05:24 मिनिट
चंद्रमाला अर्ध्य देण्याची वेळ: सूर्यास्त नंतर संध्याकाळी 05:25 मिनिट पासून रात्री 8 वाजे पर्यन्त
चंद्रमाला अर्ध्य दिल्याने कोणत्या दोषांचा प्रभाव कमी होतो?
चंद्र दोष: वैदिक ज्योतिष मध्ये चंद्रमा ला मनानी, भवनांनी व माताचे कारक असे मानले जाते. जन्म कुंडलीमधील चंद्रमाची कमजोरी किंवा प्रतिकूल स्थिति झाल्यावर चंद्रदोषची स्थिति बनू शकते. त्याच्या मुळे व्यक्तिला मानसिक बेचैनी, भावनात्मक अस्थिरता व पारिवारिक जीवन मधील तनावचा सामना करावा लागू शकतो. असे म्हणतात की कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी श्रद्धा पूर्वक चंद्र देवाला अर्ध्य देणे व त्यांची मनोभावे पूजा केल्याने चंद्रमा चा असुभ प्रभाव शांत होण्यासाठी मदत होऊ शकते.
धन संबंधित परेशानी: ज्योतिष शास्त्रा नुसार चंद्रमाचा संबंध सुख-सुविधा व आर्थिक स्थिति बरोबर जोडला गेलेला आहे. कुंडली मधील चंद्रमाची प्रतिकूल स्थिति किंवा अशुभ ग्रहांचा प्रभावच्या कारणांनी धन संचय व आर्थिक स्थिरताशी जोडणे एक चुनोती येऊ शकते. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी चंद्राची उपासना व अर्ध्य दिल्याने आर्थिक जीवनात सकारात्मकता येऊ शकते.

चंद्र ग्रहण दोष: जेव्हा जन्म कुंडलीमद्धे चंद्र बरोबर राहू केतूची युती होते तेव्हा ज्योतिष मध्ये हा ग्रहण योग समजला जातो. त्याचा अशुभ प्रभावाच्या कारणांनी व्यक्तिला मानसिक तनाव व जीवनात विविध प्रकारच्या बाधानचा सामना करावा लागतो. कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी चंद्र देवाची पूजा व जल अर्पित केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते.
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी चंद्रदेवला अर्ध्य कसे द्यावे?
कार्तिक पूर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाला की एक साफ लोटयात शुद्ध जल भरून घ्या , मग त्यामध्ये थोडे कचे दूध. अक्षता व फूल टाकून चंद्र देवाचे ध्यान करत ‘ॐ सों सोमाय नमः’ मंत्र 11 वेळा म्हणत हळू हळू जल अर्पित करा. जल अर्पित करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जल अर्पित करताना त्याचे थेंब पायावर पडता कामा नये. मग शेवटी सुख-शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करा.
