Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedies & Blessings for Shani, Rahu-Ketu Dosha In Marathi

Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedie
Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedies & Blessings for Shani, Rahu-Ketu Dosha

Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedies & Blessings for Shani, Rahu-Ketu Dosha

कालाष्टमी 1 नोव्हेंबर 2026 | कालभैरव पूजा विधी, शनि-राहू-केतू दोष मुक्तीसाठी खास उपाय व लाभ

कालाष्टमी ज्याला काल भैरव अष्टमी असे सुद्धा म्हणतात. भगवान शिवचे उग्र व रक्षक रूप काल भैरवला समर्पित एक पवित्र सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडरमध्ये प्रतेक महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथी ला साजरा करतात. पण मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी सर्वात महत्वाची मानली जाते. ह्या दिवशी भक्त भैरव अष्टमी साजरी करतात जे काल भैरवच्या दिव्य रुपाचे आहे.

अष्टमी तिथी 1 नोव्हेंबर रविवारी दुपारी 2:52 वाजता सुरू हॉट असून 2 नोव्हेंबर दुपारी 1:11 वाजता समाप्ती होत आहे. 1 नोव्हेंबर सूर्योदय सकाळी 6:36 मिनिट व सूर्यास्त संध्याकाळी 5:44 मिनिट आहे. चंद्रोदय रात्री 11:52 मिनिट व चंद्रास्त दुपारी 12:41 मिनिट होणार आहे.

शिव पुराण अनुसार, एकदा सर्व देवतांमद्धे वाद-विवाद झाला की सर्वात ताकतवार कोण आहे. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्म देवाला खूप घमंड झाला होता व त्यांनी दावा केला की तेच सर्वात चांगले आहेत. त्यांना धडा देण्यासाठी शिव ह्यांनी काल भैरव नावाचा एक भयंकर रूप धरण केले. तेव्हा रागानी भैरव ह्यांनी ब्रह्मा ह्याच्या पाच डोक्या पैकी एक डोके कापून टाकले. जे घमंड व अहंकार नष्ट करण्याचे प्रतीक होते. हे काम केल्यामुळे भैरव ना ब्रह्माचे डोके घेऊन एक भिक्षुक चे रूप घेऊन दुनिया भर फिरावे लागले. त्यांची यात्रा कधी संपली जेव्हा ते पवित्र शहर वाराणसी येथे पोचले. तेव्हा पासून काल भैरव वाराणसी क्षेत्रपालक ह्यांचे रक्षक देवता मानले जातात.

धार्मिक फोटो मध्ये काल भैरव ह्यांना काळे व भयंकर रूपमध्ये दाखवले जाते. त्यांच्या डोक्यावर कवटीची माळ, त्रिशूल व एक ढोल दाखवले जाते. व त्यांची गाडी म्हणजे एक कुत्रा आहे. असे म्हणतात की त्यांची ह्या रूपाची पूजा केल्याने भितीवर काबू राहतो, अडचणी दूर करणे व वाईट शक्ति पासून दूरी ठेवण्यास मदत होते. ह्या दिवशी परंपरा नुसार भैरव पूजा, रात्री जागरण, पवित्र भजन वाचने किंवा म्हणणे, कुत्र्यांना जेवण देणे व तेलाचा दिवा लावणे हहे सर्व शमिल होते.

कालाष्टमीचे पर्व भगवान काल भैरव ना समर्पित आहे. जे वेळेचे स्वामी व रक्षक मानले जातात. ह्या दिवशी व्रत व विधी पूर्वक पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात व ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर भक्तांची रक्षा होते व त्यांच्या प्रतेक संकटा पासून सुटका होते. हिंदू पंचांग अनुसार प्रतेक महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी तिथी ला कालाष्टमी साजरी करतात, पण वैशाख महिन्यात येणारी कालाष्टमी विशेष महत्वाची मानली जाते.

कालाष्टमी पूजाविधी:
कालाष्टमी च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करावा मग दिवसभर व्रत ठेवून पूजा अर्चा करावी. ह्या दिवशी रात्री विधी पूर्वक काल भैरव ची पूजा करावी, पूजा करताना भगवान शिव ह्यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करून मोहरीच्या तेलाचा दिवा, काले तीळ, फूल, नारळ,लाडू व मिठाई भगवान भैरव ह्यांना अर्पित करा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ आहे. दिवा लावून भैरव चालीसा चे वाचन व मंत्र जाप केला पाहिजे, त्यामुळे भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedie
Kalashtami 2026: Kaal Bhairav Puja Vidhi, Powerful Remedies & Blessings for Shani, Rahu-Ketu Dosha

कुत्र्यांना भोजन देणे एक पारंपारिक महत्व आहे:
कालाष्टमी ह्या दिवशी कुत्र्यांना भोजन देणे महत्वपूर्ण आहे. मान्यता आहे की कुत्रा भगवान काल भैरवह्यांचे वाहन आहे. म्हणून त्याला भोजन दिले तर विशेष पुण्य प्राप्त होते व जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात तसेच गरीब लोकांना व जरूरतमंद लोकांना भोजन व दान देणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.

कालाष्टमी व्रतचे फायदे किंवा लाभ:
ज्योतिष शास्त्र अनुसार कालाष्टमीचे व्रत शनि, राहू व केतूचे अशुभ प्रभाव कमी करण्यास मदत करण्यास सहायक आहे. जी लोक ग्रह दोषामुळे मानसिक तनाव पासून परेशान आहेत त्याच्या साठी हे व्रत खूप लाभदायक आहे. म्हणूनच नियमित कालभैरवची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती व सुरक्षाचा अनुभव होतो.
कालाष्टमीचे पर्व केवळ धार्मिक अनुष्ठान नाही तर आत्मिक शुद्धी व नकारात्मक शक्ति पासून मुक्ती होण्याचे एक मध्यम आहे. भक्तांनी श्रद्धा व भक्ति ने पूजा केल्यास भगवान काल भैरव आपल्या भक्तावर कृपा ठेवते व जीवन सुखमय बनवते.

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.