Vaibhav Lakshmi Friday Vrat | Complete Puja Vidhi, Mantra, Rules & Benefits
वैभव लक्ष्मी व्रत 2026 | कधी सुरू करावे? संपूर्ण पूजाविधी, नियम, मंत्र, उद्यापन व चमत्कारी लाभ
शुक्रवारचे वैभव लक्ष्मी व्रत कसे व कधी करावे? साहित्य-पूजाविधी, नियम व लाभ संपूर्ण माहिती
धन-वैभव की देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत उत्तम, शुभ व फलदायी मानले जाते. चला तर मग पाहू या वैभव लक्ष्मी व्रत कसे कधी करायचे त्याची पूजाविधी, नियम काय आहेत व त्याचे लाभ काय आहेत.
हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन व वैभवची देवी ह्या रूपात पूजले जाते. असे म्हणतात की वैभव लक्ष्मीचे व्रत केल्याने आपली आर्थिक स्थिति सुभारते. शास्त्रामध्ये धनाची देवी माता लक्ष्मीचा उल्लेख वेगवेगळ्या नावांनी केला जातो. व त्याचे वर्णन सुद्धा केले आहे. धर्म शास्त्रा नुसार माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करणे शुभ व फलदायी मानले जाते. पण हे व्रत करण्याचे काही खास नियम सुद्धा आहेत.
वैभव लक्ष्मी व्रत कधी करावे?
धार्मिक ग्रंथा नुसार वैभव लक्ष्मीचे व्रत शुक्रवार पासून सुरू करणे शुभ मानले जाते.
आपण जेव्हा पासून म्हणजे ज्या शुक्रवार पासून व्रत करणार त्यापासून पुढे 11 किंवा 21 शुक्रवार करण्याचा संकल्प करावा. आपण 11 किंवा 21 शुक्रवारचा व्रत संकल्प केल्यावर त्याचे उद्यापन शेवटच्या शुक्रवारी केल्याने व्रत केल्याचे संपूर्ण फळ मिळते.
वैभव लक्ष्मी व्रत कोणत्या सुद्धा महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथी असणाऱ्या पहिल्या शुक्रवार पासून करू शकतो. पण शास्त्रा नुसार माघ, मार्गशीर्ष व वैशाख महिन्यात सुरू केलेतर अत्यंत शुभ मानले जाते. बरेच भक्त श्रावण महिन्यात सुद्धा हे व्रत करतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा अधिकमास मध्ये वैभव लक्ष्मीचे व्रत करू नये कारणकी अधिक मास हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे.
वैभव लक्ष्मी पूजा साहित्य, पूजाविधी व स्थान:
वैभव लक्ष्मीची पूजा नेहमी आपल्याच घरी करावी.
कलश स्थापना करण्यासाठी चौरंगावर लाल रंगाचे कापड घालून त्यावर मूठ भर तांदूळ ठेवून त्यावर कलश ठेवावा. त्यामध्ये पाणी भरून त्यावर एक छोटे भांडे किंवा वाटी ठेवावी. मग त्यामध्ये सोन्याचा एखादा दागिना किंवा अंगठी ठेवावी. किंवा सोन्याचे नाणे असेलतर ते ठेवावे. जर सोने ठेवणे शक्य नसेलतर पैसे ठेवावे.
श्री यंत्र ठेवून त्याची सुद्धा पूजा करावी. त्याच बरोबर वैभव लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे: Vaibhav Laxmi Vrat Puja Vidhi
शुक्रवार ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून व्रताचा संकल्प करावा. लाल किंवा पांढरे वस्त्र परिधान करणे उत्तम आहे. संपूर्ण दिवस फलाहार करून व्रत करू शकता.
शुक्रवार संध्याकाळी परत स्नान करून पूर्व दिशेला चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड अंथरून त्यावर माता लक्ष्मी ची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. बाजूला श्रीयंत्र स्थापित करावे.
मग बाजूला मूठभर तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा पाणी भरलेला कलश ठेवावा. त्यावर एक वाटी किंवा छोटे भांडे ठेवून त्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवावा किंवा चांदीचे कोईन किंवा पैसे ठेवावे.
मग माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद-कुंकू, अक्षता अर्पित करा, छान ताजी लाल रंगाची फुले अर्पित करा. दुधाचा गोड पदार्थ किंवा खीर भोग म्हणून ठेवा, मग वैभव लक्ष्मी मंत्राचा जाप आपल्याला पाहिजे तितक्या वेळा करा, कथा आइकून मग लक्ष्मी माताची आरती म्हणावी मग भोग दाखवून उपवास सोडावा.
वैभव लक्ष्मी मंत्र:
” या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी। या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥
या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गेहिनी। सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥”
मंत्राचा अर्थ:
“जी लाल कमळात निवास करते, जी अत्यंत विलासी (आनंदी) आहे आणि जिला सूर्यासारखे तेजस्वी रूप लाभले आहे.जीचे स्वरूप लाल आहे, जिने लाल वस्त्रे परिधान केली आहेत, जी श्री विष्णूची सखी (प्रिया) आहे आणि जी मनाला आनंदित करते. जी समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे आणि जी भगवान विष्णूंची अर्धांगिनी (पत्नी) आहे.ती मनमोहक, ऐश्वर्यसंपन्न आणि कमळाच्या फुलांवर विराजमान होणारी भगवती माता लक्ष्मी माझे रक्षण करो.”

वैभव लक्ष्मी व्रत चे नियम |Vaibhav Laxmi Vrat Rules
व्रत चे पारण माता लक्ष्मीला प्रसादाची खीर दाखवून करा. ह्या दिवशी आंबट पदार्थ सेवन करणे वर्ज आहे. वैभव लक्ष्मी व्रताच्या दिवशी श्रीयंत्रची पूजा अवश्य करा.
वैभव लक्ष्मीचे व्रत आपण कोणत्या सुद्धा शुक्ल पक्ष मध्ये पहिल्या शुक्रवार पासून करू शकता. पहिल्या शुक्रवारी हातात जल व फूल घेऊन आपली मनोकामना बोलून व्रत संकल्प 11 किंवा 21 दिवस आपण हे व्रत करणार आहोत असे सांगा. संपूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर भोग दाखवून उपवास सोडावा. उपवास सोडताना सात्विक भोजन करा म्हणजे कांदा-आल-लसूण सेवन करू नये. आपण फलाहार व चहा किंवा दूध सेवन करून सुद्धा उपवास करू शकता.
आपले 11 किंवा21 शुक्रवारचे वैभव लक्ष्मीचे व्रत पूर्ण झाले की शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावे. उद्यापनच्या दिवशी विवाहित स्त्रीला घरी बोलवून तिला हळद-कुंकू लाऊन तिची ओटी भरावी व जेवणास आग्रह करावा.
वैभव लक्ष्मी व्रताचे मुख्य लाभ:
लक्ष्मी माताचे हे व्रत धनाची कमी किंवा दारिद्रता दूर करण्यासाठी करतात. त्यामुळे आपले आर्थिक लाभ मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. कर्जा पासून मुक्ती मिळून ह्या व्रताच्या प्रभावाने कर्ज लवकर फिटण्यास मदत होते. घरातील व पारिवारातील कलह मिटून सुख-शांती येऊन सकारात्मकता येते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विवाहित जीवन आनंदी होते व अखंड सौभाग्यचा आशीर्वाद प्राप्त होतो.
