14 जुलाई 2026 भौमवती आषाढ़ अमावस्या तिथी शुभ मुहूर्त स्नान-दान चे महत्व व काय करावे
14 July 2026 Bhaumvati Ashadha Amavasya | Shubh Muhurat, Snan-Daan, Pitru Tarpan & Powerful Rituals
सनातन धर्मामध्ये प्रतेक अमावस्याचे विशेष आध्यात्मिक व धार्मिक महत्व आहे. पण आषाढ अमावस्या ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. ही तिथी पितरांचे स्मरण, स्नान, जाप,तप,दान व सेवा करण्यासाठी पुण्यदायी मानली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी श्रद्धापूर्वक पितरांसाठी केले जाणारे धार्मिक कार्य पितरांच्या आत्माला शांती प्राप्त करून देते. त्याच बरोबर साधकाच्या जीवनात सुख, समृद्धी व ईश्वर कृपा कायम राहते.
धर्मशास्त्रा नुसार आषाढ अमावस्याला केले जाणारे दान खूप पुण्य देणारे असते. ह्या दिवशी सकाळी स्नान करून अन्नदान व जरूरतमंद लोकांची सेवा केल्याने भगवान श्रीहरी विष्णु व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
आषाढ अमावस्या 2026 कधी आहे?
14 जुलै 2026 मंगळवार ह्या दिवशी आषाढ अमावस्या आहे.
अमावस्या तिथी प्रारंभ 13 जुलै 2026, संध्याकाळी 6:49 वाजता
अमावस्या तिथि समाप्त: 14 जुलै 2026, दुपारी 03:12 वाजता
उदय तिथी 14 जुलै 2026 मंगळवार साजरी करायची आहे.
आषाढ़ अमावस्या धार्मिक महत्व:
आषाढ अमावस्या चा संबंध मुख्य करून पितृ तर्पण, आत्मशुद्धी व दान-पुण्यशी मानले जाते. सनातन परंपरा नुसार ह्या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण देणे, पिंडदान व श्रद्धा पूर्वक पूजा केल्याने त्यांना संतुष्टि प्राप्त होते व त्यांचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पवित्र नदी, सरोवर किंवा तीर्थस्थल मध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जे लोक तीर्थस्थळी जाऊ शकत नाही त्यांनी घरीच स्नान करून भगवान विष्णु, भगवान शिव व इष्ट देवतांची पूजा करावी.
आषाढ आमवस्या आत्मचिंतन व आध्यात्मिक साधना करण्यासाठी सर्वश्रेष्ट वेळ आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्याचे नामस्मरण, जाप, विष्णु सहस्त्रनाम, गीता वाचन केल्याने मन शांत व जीवनात सकारात्मक दिशा मिळण्यासाठी चांगला अवसर आहे.
आषाढ़ अमावस्या दान करण्याचे महत्व:
सनातन धर्ममध्ये सांगितले आहे की दान केल्याने मनुष्यच्या जीवनाचे सार्थक होते. व त्याचा उपयोग समाजात व जरूरत मंद लोकांचे कल्याण करण्यासाठी उपयोगी पडते. ह्या दिवशी भुके लोकांना भोजन द्यावे त्यामुळे भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
आषाढ अमावस्या शुभ कार्य जरूर करा:
1. ब्रह्म मुहूर्तवर स्नान करा:
आमवस्या च्या दिवशी सूर्योदयच्या अगोदर उठून स्नान करणे शुभ मानले जाते. जर पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेलतर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून आंघोळ करून तन-मन शुद्ध करून घ्या.
2. पितरांना तर्पण द्या:
आषाढ अमावस्याच्या दिवशी पितरांनचे स्मरण करणे महत्वपूर्ण मानले जाते. पाण्यात काले तीळ, मिक्स करून तर्पण द्या, ज्यांच्या घरी परंपरा आहे त्यांनी श्राद्ध किंवा पिंडदान करावे.
3. दान-पुण्य अवश्य करा:
धार्मिक मान्यता अनुसार जरूरत मंद लोकांना अन्न, वस्त्र, काले तीळ, भोजन व आपल्या आयपती नुसार दान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी केलेले दान शुभ मानले जाते व अक्षय पुण्य मिळते.
4. पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे:
सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने पितृ कृपा प्राप्त होऊन सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो.
5. हनुमानजीची पूजा करा:
भौमवती अमावस्या असल्यामुळे ह्या दिवशी हनुमानजीनची पूजा करून हनुमान चालीसा वाचन करून हनुमानजिना बुंदीचा किंवा बेसन लड्डूचा भोग दाखवणे शुभ मानले जाते. त्यामुळे साहस, आत्मविश्वास व मानसिक शक्ति वाढण्यास मदत होते.

14 July 2026 Bhaumvati Ashadha Amavasya Shubh Muhurat, Snan-Daan, Pitru Tarpan & What to Do
6. घरात धूप अवश्य लावा:
संध्याकाळी मातीच्या भांड्यात गौरी, पिवळी मोहरी व काले तीळ घालून त्याचा धूर घरात फिरवा. धार्मिक मान्यता अनुसार नकारात्मक ऊर्जा दूर होते.
7. सावधान चुकून सुद्धा ही चूक करू नका: ह्या दिवशी सात्विक भोजन करा. मास, मदिरा, कांदा लसूण किंवा तामसी भोजन सेवन करू नका.
8. केस कापणे, दाढी करणे, नख कापणे टाळावे: धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी केस कापणे, दाढी करणे, नख कापणे टाळावे कारणकी ते अशुभ मानले जाते.
9. शुभ व मंगल कार्य टाळावे: जर संभव असेलतर ह्या दिवशी विवाह, साखर पुडा, गृह प्रवेश, मुंडन, नवीन वाहन खरेदी, किंवा नवीन व्यापार सुरू करणे किंवा मंगल कार्य करू नये.
10. सकाळी उशिरा पर्यन्त झोपू नये: अमावस्याच्या दिवशी आळशीपणा झटकून द्यावा. ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करून पूजा करणे अधिक शुभ मानले आहे.
11. क्रोध व विवादा पासून दूर राहावे: ह्या दिवशी घरात भांडण, वादविवाद कोणाचा अपमान करणे टाळावे, धार्मिक मान्यता अनुसार शांत व सकारात्मक व्यवहार केल्याने शुभ फळ प्राप्त होते.
12. रात्री सुनसान जागी जाणे टाळावे: मान्यता अनुसार अमावस्याच्या रात्री शमशान किंवा सुनसान जागी किंवा निर्जन जागी जाऊ नये.
