Swami Prakat Din Ekdiwasiya Parayan Kase Karawe? Udyapan Kase Karawe? In Marathi

Swami Prakat Din
Swami Prakat Din Ekdiwasiya Parayan Kase Karawe? Udyapan Kase Karawe? Puja Vidhi

Swami Prakat Din Ekdiwasiya Parayan Kase Karawe? Udyapan Kase Karawe? In Marathi

स्वामी प्रकट दिन: एक दिवसाचे पारायण कसे करावे? उद्यापन कसे करावे? पूजेची मांडणी, पारायण केल्याचे पुण्य

20 मार्च 2026 शुक्रवार स्वामी समर्थ ह्याच्या प्रकट दिन आहे, प्रकट दिन खूप शुभ व पवित्र आहे. आज कालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला 21 दिवस किंवा 11 दिवस किंवा 7 दिवसाची सेवा करणे शक्य झाले नसेल तर आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसाचे पारायण करू शकता. एक दिवसाचे पारायण करणे खूप सोपे आहे व प्रभावी सुद्धा आहे. आपल्याला एक दिवसाचे पारायण केल्याने 11 किंवा 21 दिवसाचे पारायण केल्याचे पुण्य मिळणार आहे.

स्वामीची सेवा आपण पूर्ण श्रद्धेने केली की स्वामी आपल्या सर्व अडचणी दूर करून आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. स्वामीच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण स्वामीन कडे काहीसुद्धा मागितले नाही तरी स्वामी आपल्या मनोकामना पूर्ण करतात.

आता आपण पाहू या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी एकदिवसीय सेवा कशी करायची:
* प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे. घर साफ करून पोंचा मारताना पाण्यात थोडी हळद घालावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घराचे मुख्य द्वार साफ करून उंबरठ्यावर हळदीचे लेपन लावावे, दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावल काढावी छान रांगोळी काढावी. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

*आता देव छान स्वच्छ करून घ्या. बाजूला एक चौरंग ठेवावा त्यावर लाल किंवा पिवळे कापड घालावे. मग गणपती बापांची मूर्ती स्थापित करावी, त्याची पूजा करून हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पित करावी.

*स्वामींची मूर्ती असेलतर अभिषेक करावा अभिषेक आपण पाणी, दूध, पंचामृतनी सुद्धा करू शकता. मग स्वामिना अत्तर लावावे स्वामिनी हिना अत्तर अतिप्रिय आहे. मग झेंडूची फुले अर्पित करून दिवा अगरबत्ती लावावी, नेवेद्य म्हणून खडीसाखर किंवा साखर ठेवावी किंवा फळे ठेवली तरी चालतील पूजा करताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करत रहा.

*मग स्वामीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवा. आपली जर इछा असेलतर ठेवा. कलश ठेवताना प्रथम तांदळाची रास करा, कलश मध्ये पाणी, हळद-कुंकू, अक्षता, कॉईन व फूल घाला, कलशाच्या बाजूनी कुंकू व पाणी मिक्स करून पाच दिशेला रेघा काढा व मध्य भागी स्वस्तिक काढा.

*आता कलश तांदळाच्या राशीवर ठेवा कलशावर 5 विडयाची पाने व नारळ ठेवा. नारळाला सुद्धा हळद-कुंकू, अक्षता व फूल अर्पित करा. आता आपली पूजेची मांडणी करून झाली.

Swami Prakat Din
Swami Prakat Din Ekdiwasiya Parayan Kase Karawe? Udyapan Kase Karawe? Puja Vidhi

*मग चौरंगा समोर आसन घालून प्रथम संकल्प करावा. संकल्प करताना हातात जल,हळद-कुंकू,अक्षता व फूल घ्यावे मग आपल्या मनातील इछा स्वामिना सांगावी व जल ताम्हणात सोडावे मग ते पाणी झाडाला घालू शकता. संकल्प करताना आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत चे 21 अध्याय वाचन करणार आहोत व श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करणार आहोत असे सांगावे.

*आता आपण प्रथम गणपती अथर्वशीर्ष म्हणावे मग स्वामींची सेवा करावी शेवटी गणपती बाप्पाची आरती, अक्कल कोट स्वामीची आरती व दत्त महाराजांची आरती म्हणावी. मग गोडचा नेवेद्य दाखवावा मग संध्याकाळी वरण-भात, भाजी,चपाती व गोड पदार्थ नेवेद्य दाखवावा, स्वामींना बेसनाचे लाडू खूप प्रिय आहेत.

स्वामीचा प्रकट दिन मनोभावे व शांतपणे साजरा करा स्वामी आपल्या सर्व इछा पूर्ण करतील.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.