गुडी पाडवा 2026 तिथी, शुभ मुहूर्त, महत्व, गुडीसाठी शुभ रंग व दिशा, नवीन वर्ष कसे साजरे करावे
Gudi Padwa 2026 Puja Muhurat, Puja Vidhi, Mahatva, Shubh Rang Wa Disha In Marathi
गुडी पाडवा 19 मार्च 2026 गुरुवार ह्या दिवशी साजरा करायचा आहे. गुडी पाडवा चैत्र महिन्यात शुल्क पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला असून हिंदू लोकांचे नवीन वर्ष सुरू होत असून ह्या दिवसा पासून चैत्र नवरात्री सुद्धा प्रारंभ होत आहे. चैत्र महिन्यात झाडांची पाने गळून नवीन पालवी येते.
गुडी पाडवा 2026 शुभ वेळ व पूजा विधी:
गुडी पाडवा चैत्र महिन्यात शुल्क पक्ष प्रतिपदा तिथीला साजरा करायचा आहे. हा सण महाराष्ट्र, गोवा व दक्षिण भारतात खूप उत्साहात साजरा करतात.
ड्रिक पंचांग नुसार चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 19 मार्च सकाळी 6:52 मिनिट प्रारंभ होत असून 20 मार्च 2026 शुक्रवार सकाळी 4:52 मिनिटांनी समाप्त होत आहे. म्हणून गुडी पाडवा 19 मार्च गुरुवार ह्या दिवशी साजरा करायचा आहे. गुडी उभरताना सुर्योदय झाला की सकाळी 10:30 च्या आता उभी करावी.
गुड़ी पड़वा 2026 शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 4:51 पासून ते सकाळी 5:39 पर्यन्त
विजय मुहूर्त- दुपारी 2:30 पासून ते 3:18 पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 6:29 पासून ते संध्याकाळी 6:53 पर्यन्त
गुडी पाडवा सण कसा साजरा करायचा:
गुडी पाडवा ह्यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे परिधान करा.
आपले घर साफ करून घरा समोर सडा रांगोळी काढा.
घराचे मुख्य द्वार सुद्धा साफ करून घ्या, मग एक लाकडाची छडी, रेशीम साडी किंवा ब्लाऊज पीस घेऊन त्याला आपण साडीच्या जशा निऱ्या घालतो तश्या निऱ्या घालून त्या लाकडी छडी ला बांधून घ्या, मग त्यावर कडूलिंबाची डाहळी, फुलांचा ताजा हार, साखरेची गुडी बांधून त्यावर उलट तांब्याचा गडू किंवा तांब्या ठेवा मग त्याला लाल रंगाच्या रेशीम धाग्यानी बांधून घ्या. आपण गुडी शक्यतो आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ उजव्या हाताला लावावी शक्य नसेलतर बाल्कनी मध्ये लावावी.
जेथे आपण गुडी उभारली आहे त्याच्या बाजूनी छान रांगोळी काढून त्यामध्ये वेगवेगळे रंग भरा.
आता एका प्लेटमध्ये हालद-कुंकू, अक्षता, फुले, तुपाचा दिवा व अगरबत्ती घेऊन गुडीची पूजा करावी.
गुडी शुभ मुहूर्तावर उभारावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. गुडी उभरताना ॐ ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणावा. मग प्रार्थना करावी की ही नवीन वर्ष सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो.
गुडी खाली उतरवताना संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या वेळी उतरवावी तेव्हा परत एकदा गुडीची पूजा करावी मग गुडी खाली उतरवावी.
महाराष्टमध्ये गुडी पाडवा हा दिवस म्हणजे मराठी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पुरण पोळीचा नेवेद्य दाखवतात, किंवा काहीजण श्रीखंड-पुरी सुद्धा करतात.
गुडी पाडवा ह्या दिवशी नवीन वर्ष सुरुवात होते त्यामुळे दान धर्म करावे. गुडी पाडवा ह्या दिवशी सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेछा द्या.

गुड़ी पड़वा महत्व:
मराठी नवीन वर्षचे प्रतीक म्हणजे गुडी पाडवा, हे आध्यात्मिक व धार्मिक महत्वाचे आहे. हा दिवस म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नसून जीवनात सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान ब्रह्मा ह्यांनी सृष्टिची उत्पत्ति केली होती. म्हणूनच गुडी पाडवा हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून जीवन व मृत्यूचे चक्र सुरू होण्याचे प्रतीक आहे.
ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर उभारली जाणारी गुडी सकारात्मक व समृद्धीचे प्रतीक आहे. तिची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ति प्राप्त होते.
गुडी पाडवा हा पारंपारिक सण आहे, म्हणून ह्यादिवशी साडी नेसणे उपयुक्त व सुंदर पोशाख आहे. साडी ही शालीनता, संस्कृति व शाश्वत सुंदरता चे प्रतीक आहे. त्यामुळे आपला सण अधिक उत्साहात साजरा होतो.
गुढी पाडवा ह्या दिवशी गुडी उभरतान कडीलिंबूची पाने लावतात व ह्या दिवशी कडीलिंबाची पाने व चिंच ह्याची चटणी सेवन सुद्धा करतात त्याच्या मुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपले शरीर आतून मजबूत बनते.
प्राचीन काळा पासून असे म्हणतात की वीर मराठा छत्रपति शिवाजी महाराज हयाणी युद्ध जिकल्यावर सर्वात पहिल्यांदा गुडी उभारून हा सण साजरा केला होता. मग मराठी लोकांनी प्रतेक वर्षी गुडी उभारन्यास सुरवात केली. म्हणजेच गुडी उभारून विजय पताकाचे रूप मानून हा सण साजरा करतात.
गुडी पाडवा ह्या दिवशी नवीन वस्तु किंवा सोने चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते.
गुडी पाडवा ह्या दिवशी नख, केस कापू नयेत, त्याच बरोबर दाढी-मिशा पण कापू नये, पूजा करताना चुका करू नका, दिवसा झोपू नका.
गुडी उभरताना कोणते शुभ रंग वापरावे:
गुडी उभरताना रेशीमी साडी किंवा ब्लाऊज पीस वापरावा, तसेच शुभ रंग लाल, हिरवा, पिवळा, केशरी गडद रंग वापरावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते.
लाल रंग: लाल रंग अत्यंत शुभ, ऊर्जा देणारा व शक्तिचे प्रतीक आहे. हा रंग प्रेम, सौंदर्य व सौभाग्य व उत्साहचे प्रतिनिधित्व करतो.
हिरवा रंग: हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, प्रगती व ताजे पणाचा व शांतीचे प्रतीक आहे. मानवी मनावर शांतता आणणारा आहे. आपल्या भारतीय संस्कृतिमध्ये नवीन आयुष्याचे लक्षण मानला जातो.
पिवळा रंग: पिवळा रंग आनंद, ऊर्जा, सकारात्मकता, व बुद्धिमतेचे प्रतीक मानला जातो, हा रंग सूर्य प्रकाशाचा रंग आहे. तसेच तो प्रसन्न व उत्साह वाढवतो,खूप शुभ असून आत्मविश्वास वाढवतो.
केशरी रंग: केशरी रंग हा भारतीय संस्कृति, धर्म व खूप पवित्र व महत्वपूर्ण मानला जातो. हा रंग शौर्य, त्याग, बलिदान व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. तसेच अग्नि व शुद्धतेचे प्रतीक आहे. आपल्या भारताच्या तिरंगा मध्ये सुद्धा हा रंग आहे.
पांढरा रंग: पांढरा रंग गुडी उभरण्यासाठी काही ठिकणी वापरतात.
गुडी उभरताना आपण शुभ रंगच वापरले पाहिजेत फक्त काळा रंग आजिबात वापरू नये.
