5 Minutes Thursday Swami Samarth Seva In Marathi

shri swami samarth
5 Minutes Thursday Swami Samarth Seva

रोज स्वामींची सेवा करायला वेळ नाही, फक्त 5 मिनिट गुरुवारी सेवा करून सर्व मनोकामना पूर्ण होतील

5 Minutes Thursday Swami Samarth Seva In Marathi

आज कालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला रोज स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही. पण काही हरकत नाही फक्त गुरुवारी थोडा वेळ अगदी आवर्जून काढा व स्वामींची सेवा करा मग बघा स्वामी आठ दिवसांची सेवा केल्याचे समाधान देतील.

आपल्याला काय करायचे आहे गुरुवार ह्या दिवशी सकाळी फक्त अर्धा तास अगोदर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो स्वच्छ करून किंवा मूर्ती असेलतर मूर्तीवर अभिषेक करून घ्या. मग दिवा अगरबत्ती लाऊन फुले अर्पित करा. खडीसाखरेचा नेवेद्य ठेवा.

आपल्याला वेळच बंधन असेलतर 11 वेळ “तारक मंत्र” म्हणू शकता किंवा “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करू शकता. आपण मंत्र जाप करताना संपूर्ण निष्ठेने मनोभावे करावा तसेच मंत्र जाप करताना मोठ्या आवाजात करा म्हणजे आपल्याला तो कानांनी आईकला पाहिजे, जर आपण मंत्र जाप मनातल्या मनात केला तर आपले मन दुसरी कडे भरकटते वेगवेगळे विचार मनात येतात. म्हणून मंत्र जाप करताना मोठ्या आवाजात करावा. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. नाहीतर आपण उठता बसता चालताना श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता.

आपल्याला शक्य असेलतर श्री स्वामी चारित्रामृत मधील रोज 3 आध्याय वाचन करा किंवा ते पण शक्य नसेलतर 14 वा किंवा 18 आध्याय वाचन करावा, त्यामुळे आपला गुरु प्रबळ होतो. म्हणजेच आपल्या गुरु ग्रहाला पाठबळ मिळते. गुरुचरित्रा मधील आध्याय 14 व 18 हे दोन्ही अध्याय खूप प्रभावी आहेत.

आपण रोज नाही पण गुरुवारी तरी स्वामींच्या माठात किंवा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. तसेच औदुंबरच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारायला विसरू नका. आपण जी मनोभावे सेवा करतो त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते आपण जेव्हा संकटात असतो किंवा घरात काही अडचण येते तेव्हा आपली सेवा कामी येते व महाराज आपल्याला संकटातून बाहेर काढून मार्ग दाखवतात.

shri swami samarth
5 Minutes Thursday Swami Samarth Seva

स्वामी आपल्याला नेहमी सांगतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपण फक्त स्वामीनवर विश्वास ठेवून त्यांची मनोभावे सेवा केली पाहिजे. एक लक्षात ठेवा आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले फळ मिळते जर आपण सेवा करताना मनात कोणा बद्दल राग, लोभ ठेवून सेवा केलीतर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. म्हणून शांत मनानी शुद्ध अंतकरणांनी सेवा करा त्याचे फळ आपल्याला लवकरच दिसून येईल. तुम्ही प्रतेक गुरुवार पासून सेवा करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला आपोआप ती सवय लागेल.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.