29 जानेवारी 2026 गुरुवार जया एकादशी तिथी शुभ मुहूर्त पारणवेळ मंत्र काय करावे करू नये
29 January 2026 Jaya Ekadashi Tithi Shubh Muhurt Mantra Kay Karawe-Karunye In Marathi
माघ महिन्यात शुक्ल पक्ष ह्या तिथीला एकादशी आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केल्याने चांगली फळे प्राप्त होतात.
हिंदू धर्मामध्ये एकादशी ह्या तिथीला अत्यंत महत्व आहे. प्रतेक महिन्यात कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष ह्या तिथीला एकादशी व्रत ठेवले जाते. ह्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णु व माता लक्ष्मीची विधी पूर्वक पूजा केली जाते.
धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्ती होते. ह्या वर्षी माघ महिन्यातील जया एकादशी 29 जानेवारी ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी एकादशी व्रत करून भगवान विष्णु ह्यांची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनात सुख-समृद्धी व वैभवचा वास होतो.
जया एकादशी तिथी:
द्रिक पंचांग नुसार माघ महिन्यात शुक्ल पक्ष एकादशी तिथी 28 जानेवारी संध्याकाळी 4:34 मिनिट नि प्रारंभ होत असून 29 जानेवारी दुपारी 1:56 मिनिटांनी समाप्ती होत आहे. 29 जानेवारी गुरुवार ह्या दिवशी जया एकादशी आहे.
जया एकादशी पूजा मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 5:25 ते 6:18 मिनिट
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:13 मिनिट ते 12:56 मिनिट
जया एकादशी पारण वेळ:
जया एकादशी 29 जानेवारी म्हणून पारण 30 जानेवारी ला आहे. ह्या दिवशी सकाळी 7:10 मिनिट ते 9:20 मिनिट पारण शुभ वेळ आहे. द्वादशी तिथी समाप्ती 11:09 सकाळी

जया एकादशी महत्व:
जया एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची विधी पूर्वक आराधना केल्याने भक्ताच्या जीवनातील मनोकामना पूर्ण होऊन उत्तम आरोग्य प्राप्ती होते. धार्मिक मान्यता अनुसार व्रताच्या प्रभावाने व्यक्तिच्या जीवनातील समस्त पापान पासून मुक्ती मिळते त्याच बरोबर वैकुंठ धामची प्राप्ती होते. जया एकादशी प्रतेक कामात विजय देणारी व कल्याणकारी मानली जाते.
जया एकादशी व्रतच्या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते. शास्त्रामध्ये जया एकादशी व्रत ही अत्यंत शक्तिशाली मानले जाते.
जया एकादशी विष्णु मंत्राचा जाप करावा:
* ॐ नमो भगवते वासुदेवाय
* श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
* ॐ विषणवे नम:
जया एकादशी उपाय किंवा काय करावे- करू नये:
जया एकादशी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून चौरंग ठेवून त्यावर वस्त्र टाकून भगवान विष्णु ह्यांची प्रतिमा ठेवून मनोभावे पूजा आरती मंत्र जाप करून भगवान विष्णु ह्यांना नवेद्य दाखवावा. ह्या दिवशी भात किंवा भाता पासून बनवलेले पदार्थ सेवन करणे टाळा. ह्या दिवशी केस व नख कापू नयेत. क्रोध, खोटे बोलणे किंवा निंदा करणे टाळावे, तुळशीची पाने तोडू नयेत, कारण तुळशी सुद्धा एकादशी व्रत करते. ब्रह्म मुहूर्त वर उठावे व दिवसा झोपू नये, सात्विक आहार सेवन करावा, ब्रह्मचार्यचे पालन करावे, विष्णु सहस्त्रनाम व भजन आइकावे. पूजा घर स्वच्छ ठेवावे त्यामुळे भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळेल.
