Shardiya Navaratri 9 Days Bhog List In Marathi
शारदीय नवरात्री 9 दिवसांचे 9 विविध दुर्गामाताचे भोग, मिळेल जीवनात सुख-समृद्धी
शारदीय नवरात्रि माता दुर्गाल समर्पित आहे. असे म्हणतात की ह्या 9 दिवसांत दुर्गामाताला 9 विविध भोग दाखवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्री मध्ये प्रतेक दिवशी देवीच्या प्रतेक रूपाला तिचा प्रिय भोग दाखवल्यास माता प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करील.
शारदीय नवरात्री 9 दिवसाचे 9 वेगवेगळे भोग कोणते ते पाहू या:
पहिला दिवस (माता शैलपुत्री) ह्या दिवशी दुर्गा माताचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा करतात. तिला गाईच्या तुपाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते त्यामुळे रोग व कष्ट दूर होतील.
दूसरा दिवस (माता ब्रह्मचारणी) माता ब्रह्मचारणील खडीसाखरेचा भोग दाखवल्यास साउख समृद्धी येते.
तिसरा दिवस (माता चंद्रघंटा) माता चंद्रघंटाला खीर चा भोग दाखवल्यास मानसिक शांती मिळते व जीवनातिल सर्व दुख दूर होतात.
चौथा दिवस (माता कूष्मांडा) माता कूष्मांडा ला मालपुवा खूप पिय आहे त्यामुळे मालपुवाचा भोग दाखवल्यास देवी माता प्रसन्न होऊन जीवनातील दुख दूर होतील.
पाचवा दिवस (माता स्कंदमाता) माता स्कंदमाताला केळ्याचा भोग दाखवतात त्यामुळे आपली तबेत चांगली राहून जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
सहावा दिवस (माता कात्यायनी) माता कात्यायनीला मधाचा भोग दाखवतात. त्यामुळे साधकाची आकर्षण शक्ति वाढून नाते संबंधात सुधारणा होते.
सातवा दिवस (माता कालरात्री) ह्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. त्यांना गुळाचा किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा भोग दाखवा त्यामुळे नकारात्मक शक्ति दूर होऊन भय पासून मुक्ती मिळेल.

आठवा दिवस (माता महागौरी) माता महागौरी ला नारळाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या मुलां संबंधित समस्या दूर होतील.
नववा दिवस (माता सिद्धीदात्री) नववा दिवस म्हणजे शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस ह्या दिवशी माता सिद्धीदात्रीची पूजा करून तिळाचा किंवा तिळाच्या पदार्थाचा भोग दाखवल्यास अचानक येणारी संकटे दूर होऊन आपल्याला सुरक्षा मिळते.