महाभरणी श्राद्ध पितरांच्या शांतीसाठी खास दिवस तिथी, महूर्त, साहित्य व विधी काय आहे?
11 September 2025 Maha Bharani Shraddha Full Information In Marathi
महाभरणी श्राद्ध 11 सप्टेंबर गुरुवार ह्या दिवशी आहे. पितृ पक्ष मधील भरणी नक्षत्रमध्ये केले जाणारे श्राद्ध पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी व आशीर्वादसाठी खूप शुभ मानले जाते. ह्या दिवशी पिंडदान, तर्पण, दान करणे त्यामुळे विशेष पुण्य मिळते.
11 सप्टेंबर गुरुवार ह्या दिवशी महाभरणी श्राद्ध आहे. धार्मिक मान्यता अनुसार जेव्हा विशेष तिथीला दुपारी भरणी नक्षत्र केले जाते त्या दिवसाला महाभरणी श्राद्ध मानले जाते. हे श्राद्ध केल्याने पितरांना शांती मिळते. धार्मिक मान्यता अनुसार भरणी नक्षत्रचे स्वामी यम आहेत म्हणूनच ह्या नक्षत्रला श्राद्ध करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. हिंदु कॅलेंडर नुसार पितृ पक्ष मधील भरणी नक्षत्र खूप शुभ मानले जाते. भरणी नक्षत्र बरेचवेळा चतुर्थी किंवा पंचमी ह्या तिथीला असते. काही वेळेस तृतीय किंवा षष्टि ह्या तिथीला सुद्धा येते.
महाभरणी श्राद्ध तिथी व वेळ:
महाभरणी श्राद्ध गुरुवार 11 सप्टेंबर ला आहे.
मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 01:09 पर्यन्त
श्राद्ध विधी:
ज्योतिषशास्त्रा नुसार श्राद्ध ब्राह्मणा कडून, पिंडदान व तर्पण योग्य रित्या केले पाहिजे. त्यामुळे पितरांना शांती मिळते. ब्राह्मणाना भोजन व दान धर्म करून गरीब लोकांची सेवा व मदत केली पाहिजे. असे केल्याने पुण्य मिळते. गाय, कुत्र्याला व कावळ्याला घास दिला पाहिजे. त्यादिवशी पितरांनची आठवण काढून त्यांना जेवण दिले पाहिजे. जर गंगा नदीवर श्राद्ध केलेतर उत्तम जर शक्य नसेलतर आपल्या घरीसुद्धा करून त्यांना तृप्त करू शकता.
श्रद्धाचे साहित्य:
श्रद्धासाठी पुढील साहित्य उपयोगात आणले जाते.
रोली, कुंकू, सुपारी, रक्षा सूत्र, तांदूळ, जानवे, कापुर, हळद, तूप, माचिस, मध, काळेतिल, तुळशी, पान, जवस
हवन करण्यासाठी साहित्य: गूळ, पणती, कापसाची वात, अगरबत्ती, दही, गंगाजल, पांढरी फुले, उडद, खीर, मग, उस

भरणी श्राद्ध करण्याचे लाभ:
महाभरणी श्राद्ध करण्याचे फळ हे गयामध्ये श्राद्ध करण्या समान असते. त्यामुळे पितरांना शांती मिळते व ते आपल्याला आशीर्वाद देतात. भरणी श्राद्ध विशेष रूपात पितरांच्या मुक्तीसाठी व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
श्राद्ध करताना नियम पूर्वक केले पाहिजे त्यामुळे पितरांच्या आत्माला शांती मिळेल व परिवाराला आशीर्वाद मिळेल.
भरणी श्राद्ध करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. भरणी श्राद्ध करताना आपल्या मृत व्यक्तीला जाऊन एक वर्ष झाले पाहिजे म्हणजे त्यांचे पहिले वर्ष श्राद्ध झाले पाहिजे त्यानंतरच त्या व्यक्तीचे भरणी श्राद्ध करू शकतो.