पितृ पक्ष 2025 महत्व नियम व रात्री करा हे सटीक उपाय, सर्व दुख होतील दूर
Pitru Paksha 2025 Mahatva, Niyam V Satik Upay In Marathi
आता पितृ पक्ष 7 सप्टेंबर 2025 रविवार पासून सुरू होत असून 21 सप्टेंबर रविवार ह्या दिवशी समाप्ती होत आहे. पितृ पक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. पितृ पक्ष ह्या काळात श्राद्ध, तर्पण व पिंडदान करून पितरांना मुक्त केले जाते. असे म्हणतात की ह्या 15 दिवसांत आपले पितृ धर्तीवर येवून आपली सर्व दुख व कष्ट दूर करतात.
पितृ पक्ष आपल्या पितरांना समर्पित आहे ह्या काळात आपल्या पिरतरांना तर्पण दिलेतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
पितृ पक्षला हिंदु धर्मामध्ये खूप महत्व आहे. हे दिवस आपल्या पितरांना समर्पित आहेत. हे 15 दिवस हिंदु धर्मामध्ये महत्वपूर्ण आहेत. ह्या वर्षी 7 सप्टेंबर 2025 पासून पितृ पक्ष सुरू होत असून
21 सप्टेंबर पर्यन्त आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण व पिंडदान करून त्यांना मुक्ती मिळू दे म्हणून प्रार्थना करावी. असे म्हणतात की हे 15 दिवस आपले पितृ धर्तीवर येऊन आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात.
श्राद्धचे महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात व वंशा ला आरोग्य, धन-धान्य व समृद्धीचा आशीर्वाद देतात. गरुड पुराणा मध्ये सांगितले आहेकी जी व्यक्ति श्राद्ध विधिपूर्वक करते तिला सुख-शांती मिळते. पितरांना अन्न व जल अर्पित केल्याने त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे पितर संतुष्ट होतात व आपल्या जीवनात येणाऱ्या बाधा दूर करतात.
शास्त्रामध्ये असे सांगितले आहेकी माता-पिता व आपले पूर्वजांचे ऋण उतरवण्याचे कर्तव्य हे संतानचे आहे. असे केल्याने थोड्या फार प्रमाणात तरी ऋण चुकते केले जाते. जे लोक आपल्या पितरांचे श्राद्ध करीत नाहीत त्यांच्या जीवनात येणाऱ्या बाधा व कष्ट ह्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी पितूर पंढरवडाच्या काळात आपण त्यांचे स्मरण करून त्याचे श्राद्ध केले पाहिजे.
श्राद्ध करण्याचे प्रमुख नियम:
*तिथीचे महत्व: पितरांचे श्राद्ध हे त्यांच्या मृतु तिथी अनुसार केले जाते. जर तिथी माहीत नसेलतर सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी श्राद्ध केले जाते.
स्थानाची शुद्धी: श्राद्ध कार्य पवित्र स्थाना वरती करावे. घरात पवित्र तीर्थ जागी केलेतर विशेष फलदायी मानले जाते.
आहार संबंधित नियम: श्रद्धासाठी सात्विक भोजन बनवले जाते. लसूण,कांदा किंवा मासाहार वर्जित आहे.
पिंडदान व तर्पण: जल,तिल,व कुशनी तर्पण व पकवान बनवून पिंडदान केले जाते. हे पितरांपर्यन्त ऊर्जा व तृप्ती पोहचवण्याचे माध्यम आहे.
ब्राह्मण भोजन: श्राद्धच्या दिवशी ब्राह्मण भोजन घालणे आवयशक आहे. कारणकी ब्रह्मण हे देव व पितरांच्या मध्ये सेतु बांधण्याचे काम करते.
श्राद्धचा भाव: शास्त्रामध्ये सांगितले आहे की विधी जरी पूर्ण नाही केले तरी जर श्राद्ध पूर्ण भक्तिभावानी केले तरी पितर संतुष्ट होतात.
काही गोष्टी कटाकक्षांनी पाळाव्या: श्रद्धाच्या दिवशी मनोरंजन, दारू पिणे, व दिखावा करणे अशुभ मानले जाते. तसेच संपूर्ण दिवस संयमानी राहावे.

पितृ पक्ष मध्ये रोज रात्री आपण काही सोपे उपाय केले तर आपले सर्व कष्ट दूर होतील, टे कोणते उपाय आहेत ते आपण पाहू या:
* पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावावा: पितृ पक्षमध्ये रोज रात्री पिंपळाच्या वृक्षाच्या खाली दिवा लावल्याने खूप शुभ फळ मिळतात. असे म्हणतात की पिंपळच्या वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो. म्हणून रोज रात्री किंवा सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी तरी पिंपळच्या वृक्षाखाली दिवा जरूर लावावा. त्यामुळे पितृ दोषा पासून मुक्ती
मिळेल.
* दक्षिण दिशेला दिवा लावावा: असे म्हणतात की घराच्या दक्षिण दिशेला आपल्या पितरांचा वास असतो. म्हणून पितृ पक्षमध्ये रोज दक्षिण दिशेला दिवा लावावा. हा दिवा लावताना मोहरीचे तेल घालून आपल्या पितरांसाठी दिवा लावावा असे केल्याने आपल्या पितरांना शांती मिळेल व त्यांचा आशीर्वाद मिळेल.
*कावळा किंवा कुत्र्याला भोजन द्या: रात्री आपले जेवण करण्याच्या अगोदर एका प्लेटमध्ये पितरांसाठी जेवण बाजूला काढून ठेवावे. व ते जेवण कावळ्याला किंवा कुत्रा ह्यांना खायला द्यावे. धार्मिक मान्यता अनुसार आपले पितृ ह्या रूपात येवून भोजन ग्रहण करतात. असे केल्याने पितृ खुश होतात व आपल्या घरात कधी सुद्धा अन्न धान्यची कमतरता होत नाही.
*पितरांसाठी ध्यान करा: रात्री झोपण्याच्या अगोदर आपले मन शांत ठेवून आपल्या पितरांसाठी ध्यान करा, त्यांच्या नावाचा जाप करून आपल्या कडून काही चूक झाली असेलतर त्या बद्दल माफी मांगा व आपल्या जीवनात सुख-शांती मिळण्यासाठी आशीर्वाद मागा हा एक सर्वात सोपा व शक्तिशाली उपाय आहे.