Tarak Mantra Tirth Kase Banawawe, Garbhwati Mahilanni Roj Jap Karawa In Marathi
तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे, गर्भवती महिलांनी गर्भ संस्कारासाठी हा
मंत्र रोज म्हणावा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
तारक मंत्र हा खूप प्रभाव शाली मंत्र आहे. स्वामी समर्थ ही आपले तारण कर्ता आहेत.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जाप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते, आपल्या मनाची एकाग्रता वाढते, त्याच बरोबर सकारात्मकता वाढून नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊन आपल्याला बळ मिळते, आपल्या जीवनात यश व संरक्षण मिळण्यास मदत होते.
स्वामी तारक मंत्र जापचे फायदे:
आपल्याला मानसिक शांती मिळून ताणतणाव कमी होतो.
आपला जर रंगीट स्वभाव असेलतर त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
आपल्या प्रतेक कामात काम करण्यासाठी एकाग्रता वाढते व आपले विचार सकारात्मक बनतात.
त्याच बरोबर नकारात्मक विचार व वाईट शक्ति पासून संरक्षण मिळते.
आपले आरोग्य सुधारून रोगप्रतिकार शक्ति वाढते.
रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते.
आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आत्मिक बळ वाढते.
आपल्याला जीवनात यश मिळते.
आपल्या पदरी निराशा येत नाही व कोणी आपल्याला फसवू शकत नाअहो.
तारक मंत्र जाप मुले घरात सकारात्मक ऊर्जा येते.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
आता आपण पाहू या तारक मंत्र तीर्थ कसे बनवावे:
आपण त्या अगोदर पाहू या तारक मंत्रचे तीर्थ कशासाठी व कसे बनवावे:
प्रतेक व्यक्तीच्या जीवनात संकटे, आजारपण येत असतात, कामांमध्ये अडथळे येतात म्हणजेच कामे पार पडत नाहीत, नवरा आईकत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा मुले वाईट वळणाला लागतात, घरात सतत भांडणे होतात. तर त्यासाठी तारक मंत्र हा सर्वात प्रभावी मंत्र आहे व ह्या मंत्र जापाने जल म्हणजेच पाणी अभिमंत्रित करून आपल्या जीवनातील अडचणी, संकटे, आजारपण कसे दूर करायचे ते पाहू या.
तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे:
आपण एक पाण्यांनी भरून एक तांब्या घ्यायचा, तांब्या आपण स्टील, पितळ, चांदीचा कोणता सुद्धा घ्यायचा व आपल्याला जेव्हडे तीर्थ पाहिजे तेव्हडेच पाणी घ्यायचे कारणकी ही जल आपण अभिमंत्रित करणार आहोत व ते आपण टाकून द्यायचे नाही त्यामुळे जेव्हाडे जल पाहिजे एवहडेच घ्या.
आपण श्री स्वामी समर्थ ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती समोर आसन घालून बसायचे आहे. फोटो किंवा मूर्ती समोर अगरबत्ती लावायची आहे. मग आपण स्वामिना आपण कोणत्या कारणासाठी ही करत आहोत ते कारण सांगून एक संकल्प करून घायचा आहे.
तारक मंत्र जाप सुरू करण्याच्या अगोदर आपण तांब्या आपल्या डाव्या हातात घेऊन त्यावर उजवा हात ठेवून तांब्या आपल्या हातांनी झाकून 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. असे आपण 11 दिवस 21 दिवस किंवा 40 दिवस करू शकता.

आपण मंत्र जाप पूर्ण केल्यावर तांब्यामधील जल ही मंत्र जाप मुळे अभिमंत्रित होते व हे जल आपण घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून देवू शकता किंवा आजारी माणसाला देवू शकता किंवा त्याचवर शिपडू शकता किंवा घरामध्ये सुद्धा सर्वत्र शिंपडू शकता. आपल्याला लवकरच त्याची प्रचिती दिसून येईल व आपण ज्या कारणांसाठी संकल्प केला आहे ते काम पूर्ण होईल.
गर्भवती महिलांनी आपल्या बाळासाठी रोज 5, 7 किंवा 11 वेळा तारक मंत्र जाप करावा, त्यामुळे आपल्या बाळाला संरक्षण मिळून दिव्य ऊर्जा मिळते, आपल्याला मानशांति मिळून, सकारात्मकता, धैर्य, मिळून आध्यात्मिक प्रगती होते, आई व बाळाचे रक्षण होते.
आईने मुलांसाठी उपाय केला तर मुलांची चांगली प्रगती होईल