Shravan Shukrawar 2025 Jivati Chi Puja Mahilanchya Surakshe Sathi In Marathi
श्रावण शुक्रवार जिवतीची पूजा मुलांच्या सुख-समृद्धी, आरोग्य, दीर्घायुष व सुरक्षेसाठी करू शकताच
उद्या दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आहे ह्या दिवशी पूजा अर्चा व दीप दान करण्याचे महत्व आहे. त्याचा विडियो मी ह्या अगोदर पब्लिश केला आहे त्याची लिंक description बॉक्स मध्ये दिलेली आहे.
25 जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी श्रावण शुक्रवार आहे. त्यामुळे पहिल्याच शुक्रवारी जिवतीची पूजा करायची आहे. जिवती माता ही पार्वती माताचे रूप आहे ती आपल्या मुलांचे रक्षण करते.
पहिला शुक्रवार 25 जुलै 2025
दूसरा शुक्रवार 01 ऑगस्ट 2025
तिसरा शुकवार 8 ऑगस्ट 2025
चौथा शुक्रवार 15 ऑगस्ट 2025
पाचवा शुक्रवार 22 ऑगस्ट 2025
पहिल्या शुक्रवारी घरात जीवतीचा कागद आणावा. देव्हारा स्वच्छ करून देवांची पूजा अर्चा करून देव्हाऱ्या शेजारी जीवतीचा कागद लावावा. हळद-कुंकू लावावे, अक्षदा अर्पित कराव्या, वस्त्र अर्पित करावे, अघाडा व दूर्वाची माळ लावावी, हार फुले अर्पित करावी. तेलाचा व तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, दूध साखर किंवा गूळ-खोबरे ठेवावे.
पूजा झाल्यावर जिवतीची आरती करावी. मुलांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. मग आपल्या मुलांना ओवाळावे. जर मुले बाहेर गावी असतील तर चारही दिशांना ओवाळावे. असे श्रावण महिन्यात 4 किंवा 5 शुक्रवार करावे, शेवटच्या शुक्रवारी पुरणाचा नेवेद्य दाखवून उद्यापन करावे. मग दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करावी.
जीवतीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची त्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: जीवतीची पूजा
जीवतीचे हे व्रत कोणी सुद्धा महिला करू शकता म्हणजे ज्यांना मुले आहे त्या महिला, विधवा महिला किंवा गरोदर महिला सुद्धा हे व्रत आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करू शकतात.
जिवतीची आरती पुढे दिलेली आहे.
श्रीजिवतीची आरती:
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥

श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥