पौष पुत्रदा एकादशी 2025 6 संयोग मिळेल दुप्पट फळ, संतान सुख मिळेल, श्रीहरी होतील प्रसन्न
Poush Putrada Ekadashi 2025 Information In Marathi
सनातन धर्मामध्ये एकादशी तिथी विशेष महत्वाची आहे. तसेच भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर एकादशीचे व्रत केले जाते. ह्या शुभ अवसरवर लक्ष्मी नारायणची विशेष पूजा केली जाते.
वैदिक पंचांग अनुसार 10 जानेवारी 2025 ह्या दिवशी पौष पुत्रदा एकादशी आहे. ही वर्षी पौष मास शुक्ल पक्ष एकादशी आहे. ह्या दिवशी व्रत केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे व्रत केल्याने ज्यांना संतान नाही त्यांना संतती प्राप्ती होऊ शकते. ज्योतिष शास्त्रा नुसार पुत्रदा एकादशी ह्या दिवशी दुर्लभ शिववास योग आहे त्याच बरोबर अजून काही मंगळकारी संयोग बनत आहे.
शुभयोग:
ज्योतिष शास्त्रा नुसार पौष पुत्रदा एकादशी ह्या दिवशी शुभ संयोग आहे हा योग दुपारी 2 वाजून 37 मिनिट वर आहे. ह्या वेळेला लक्ष्मी नारायणची पूजा केल्याने भक्ताला अक्षय फळ प्राप्त होते. त्याच बरोबर बिघडलेली कामे नीट होतात.
शुक्ल योग:
पौष पुत्रदा एकादशीवर शुभ योग नंतर शुक्ल योगचा संयोग आहे. शुक्ल योग पूर्ण रात्र आहे. ह्या दिवशी रात्री जागरण करून भगवान विष्णुची पूजा अर्चा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतील.
नक्षत्र एवं करण:
पौष मास मध्ये शुक्ल पक्ष एकादशी तिथीवर रोहिणी नक्षत्रचा योग आहे. ह्या योगाचा शुभ काळ दुपारी 1 वाजून 45 मिनिट वर आहे. ह्या वेळी लक्ष्मी नारायण ह्यांची पूजा अर्चा केल्याने त्यांची विशेष कृपा मिळते.
भद्रावास:
पौष पुत्रदा एकादशी ह्या दिवशी तिथीवर भद्रवास व शिववास ह्यांचा योग आहे. भद्रावासचा योग सकाळी 10 वाजून 19 मिनिट वर आहे. व शिववास हा योग 10 वाजून 19 मिनिट वर आहे. देवांचे देव महादेव पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी कैलाश पर्वतावर विराजमान होतात. ह्याच काळात भगवान विष्णुह्यांची पूजा केल्याने साधकाला सर्व सुखाच्या प्राप्ती होतात.
पौष पुत्रदा एकादशी ह्या दिवशी श्रीहरी व माता लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चा केल्याने कृपा दृष्टी मिळते व संतान संबंधित परेशानी दूर होतात. ह्या दिवशी व्रत केल्याने सर्वगुण संपन्न संतती प्राप्त होते.
एकादशी व्रत करण्याचे लाभ-Ekadashi Vrat ke Labh
एकादशीचा उपवास केल्याने व पितृ तर्पण केल्याने पितृ प्रसन्न होऊन जीवनात आलेल्या परेशानी दूर करतात.
एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
धार्मिक दृष्ट्या दर महिन्यातील एकादशीही महत्व पूर्ण असते. ह्या दिवशी विष्णु भगवान ह्याची पूजा केल्याने पुण्यदाई फळ मिळते.
एकादशी व्रत केल्याने व त्याचे माहात्म्य वाचल्याने मनुष्याची पाप धुतली जातात व सुखी जीवन जाऊन वैकुंठची प्राप्ती होते,
धार्मिक पुराणानुसार एकादशी व्रत सर्व मनोकामनाची पूर्ती करणारा व्रत दिवस आहे.