Tricks: Surprising Benefits of Burning Bay Leaf At Home In Marathi

Bay Leaf
Tips And Tricks: Surprising Benefits of Burning Bay Leaf At Home

ट्रिक: रात्रीच्या वेळी किचनमध्ये तमालपत्र जाळण्याचे चमत्कारी फायदे

Tricks: Surprising Benefits of Burning Bay Leaf At Home In Marathi

आपणा सर्वांचे तमालपत्र हे परिचयाचे आहे. आपण स्वयंपाक करताना ते नेहमी वापरतो त्यामुळे आपल्या पदार्थाला चांगली टेस्ट येते. पण त्याचे अजून काही चमत्कारी फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेवू या. आपल्याला हे तमालपत्र रात्री जाळायचे आहे.

रोज रात्री तमालपत्र जाळण्याचे चमत्कारी फायदे ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: रोज रात्री तमालपत्र जाळण्याचे चमत्कारी फायदे

* घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी तमालपत्रचा उपयोग करा. रोज रात्री एक तमालपत्र जाळून स्वयंपाक घरात एक कोपऱ्यात ठेवा काही दिवसांतच सगळी झुरळ पळून जातील. पण लक्षात ठेवा की एका वेळी जास्त तमालपत्र जळू नका एक वेळी एकच तमालपत्र जाळा त्याचा नक्की फायदा होईल.

Bay Leaf
Tips And Tricks: Surprising Benefits of Burning Bay Leaf At Home

* घरात सुगंधी वातावरण निर्माण होण्यासाठी आपण वेगवेगळी महागडी सुगंधित रूम फ्रेशनर आणतो. महागडी अत्तर सुद्धा आणतो. पण अगदी स्वस्त व मस्त काम एक तमालपत्र करू शकते. तमालपत्रला एक उपयुक्त रूम फ्रेशनर म्हणून मानले जाते. पूर्वीच्या काळी कुठे रूम फ्रेशनर असायचे तेव्हा लोक तमालपत्र जाळून त्याचा उपयोग रूम फ्रेशनर म्हणून करायचे. पूर्वीच्या काळी तमालपत्र बरोबर लोक लवंग सुद्धा जाळून त्याचा रूम फ्रेशनर म्हणून उपयोग करायचे. पण रात्रीच्या वेळी तमानपत्र जाळले तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो.

*रात्रीच्या वेळी एका भांड्यात एक तमालपत्र आपल्या खोलीत जाळल्याने त्याचा फक्त सुगंधच येत नाहीतर डोके शांत होऊन त्याच्या सुगंधाने मानसिक तनाव कमी होऊन चिडचिड कमी होते.

* रात्रीच्या वेळी तमालपत्र जाळल्याने आपली रोगप्रतिकार शक्ति वाढते तसेच असे म्हणतात की त्याच्या धुरामुळे वातावरणातील दूषित कण मरून जातात व घरातील निगेटिव्ह एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते.

* रात्रीच्या वेळी झोपल्यावर आपल्याला वाईट स्वप्न येऊन आपण परेशान होत असालतर रात्री झोपताना नक्की एक तमालपत्र जाळा त्यामुळे तुमच्या मधील निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल व तुम्हाला वाईट स्वप्न येणार नाहीत.

* घरातील व्यक्तीला कोणाची वाईट नजर लागली असेलतर रात्रीच्या वेळी एक तमालपत्र जाळताना त्यामध्ये एक लवंग टाकून जाळा त्यामुळे त्या व्यक्तीला लागलेली नजर दूर होईल.

* बरेच वेळ आपण कशाचे ना कशाचे टेंशन घेतो त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते तर राज रात्री घरात किंवा आपल्या रूममध्ये एक तमाल पत्र जाळा त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल.
एका तमालपत्र जाळल्या मुळे त्याचे कितीतरी चांगले परिणाम होतात.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.