Paush Purnima 2023 Durlabh Yog | Puja Muhurat | Puja Vidhi In Marathi

Paush Purnima 2023
Paush Purnima 2023 Durlabh Yog | Puja Muhurat | Puja Vidhi

पौष पूर्णिमा 2023 दुर्लभ योग पूजा मुहूर्त शुभ योग व पूजा विधी लक्ष्मी माताची कृपा होईल 

हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा व अमावस्या ह्या तिथीचे खूप महत्व आहे. पौष पूर्णिमा ह्या वर्षातील पहिलीच पूर्णिमा आहे ह्या दिवशी 4 दुर्लभ योग येत आहेत. पौष पूर्णिमा ह्या दिवशी हे काम केलेतर लक्ष्मीमाताची कृपा होईल.

The text Paush Purnima 2023 Durlabh Yog | Puja Muhurat | Puja Vidhi in Marathi be seen on our You tube Chanel Paush Purnima 2023

नवीन वर्षात पौष पूर्णिमा 6 जानेवारी शुक्रवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी येणारी पूर्णिमा खूप खास आहे. आपण आता पाहूया ह्या दिवशी मुहूर्त, शुभ योग व पूजा विधी काय आहे.

शुक्ल पक्ष म्हणजे देवी-देवतांचा काळ असे म्हंटले जाते त्यामुळे शुल्क पक्ष मध्ये येणारी पूर्णिमा ही शुभ मानली जाते. पूर्णिमा ह्या दिवशी चंद्रा बरोबर लक्ष्मी-नारायणची सुद्धा पूजा अर्चा करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी उपवास करून घरामध्ये सत्यनारायणची पूजा केल्यास आपल्याला जीवनात सुख मिळते व मृत्यू नंतर पुढील जन्मामध्ये सुद्धा धन, शांती, सुख समृद्धी मिळते. वर्षांची पहिली पूर्णिमा खास मानली जाते.

Paush Purnima 2023
Paush Purnima 2023 Durlabh Yog | Puja Muhurat | Puja Vidhi

पौष पूर्णिमा 2023 शुभ योग (Paush Purnima 2023 Shubh yoga)

नवीन वर्षी पहिली पूर्णिमा 6 जानेवारी शुक्रवार ह्या दिवशी आहे. ही पूर्णिमा खास आहे म्हणजे दोन योग आहेत एक म्हणजे शुक्रवार आहे व पूर्णिमा तिथी सुद्धा आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी माताचा आशीर्वाद मिळू शकतो. म्हणूनच ह्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊ शकते. तसेच ह्या दिवशी ब्रह्म, इंद्र व सर्वार्थ सिद्धि योग येत आहे. त्यामुळे ह्या दिवसाचे महत्व वाढले आहे.

* इंद्र योग – 06 जानेवारी 2023, सकाळी 08.11 – 07 जानेवारी 2023,सकाळी 08.55 पर्यन्त
* ब्रह्म योग – 05 जानेवारी 2023, सकाळी 07.34 – 06 जानेवारी2023, सकाळी 08.11 पर्यन्त
* सर्वार्थ सिद्धि योग – सकाळी 12.14 – सकाळी 06.38 (7 जानेवारी 2023)

* पौष पूर्णिमा 2023 मुहूर्त (Paush Purnima 2023 Shubh Muhurat)
* पौष पूर्णिमा तिथि आरंभ – 6 जानेवारी 2023, सकाळी 2.14
* पौष पूर्णिमा तिथि समाप्त – 7 जानेवारी 2023, सकाळी 04.37
* अभिजित मुहूर्त – सकाळी 11:33 – दुपारी 12:15
* चंद्रोदय वेळ – संध्याकाळी 04.32 (पूर्णिमा ह्या दिवशी चंद्राची पूजा करणे उत्तम असते.)

पौष पूर्णिमा पूजा विधि (Paush Purnima Puja vidhi)
पौष पूर्णिमा ह्या दिवशी शाकंभरी पूर्णिमा सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर उठावे व अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. ह्या दिवशी व्रत करून संकल्प करून लक्ष्मी-नारायण ह्यांची रोली, मौली, हळद, फूल, मिठाई, पंचामृत व नेवेद्य दाखवून पूजा करावी. सत्यनारायण भगवान ह्यांची कथा वाचावी. श्रीहरी चे भजन म्हणावे. संध्याकाळी चंद्राची पूजा करून दूध साखर व तांदूळ घालून अर्ध्य द्यावे. जर शक्य असेलतर लक्ष्मी माताची मध्य रात्री पूजा करावी त्यामुळे घरात लक्ष्मी माता स्थिर राहते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.