Nani Dadi Ke Nuskhe 10 Home Remedies For Cold and Cough In Marathi

10 Home Remedies For Cold and Cough
Nani Dadi Ke Nuskhe 10 Home Remedies For Cold and Cough

सर्दी खोकला पासून परेशान आहात करा हे 10 घरगुती सटीक उपाय दादीके नुस्खे 

सर्दी खोकला हा प्रतेक बदलणाऱ्या मोसमानुसार होणारी समस्या आहे. खोकला हा बैक्टीरियल किंवा वायरल इन्फेक्शन, एलर्जी किंवा थंडी मुळे सुद्धा होत असतो. ह्या समस्यापासून आराम मिळण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाक घरातील काही पारंपारिक उपाय करू शकता.

The text Nani Dadi Ke Nuskhe 10 Home Remedies For Cold and Cough in Marathi be seen on our You tube Chanel Nani Dadi Ke Nuskhe 10 Home Remedies For Cold and Cough

चला तर मग आपण पाहू या आपल्या स्वयंपाक घरातील कोणते नुस्खे किंवा उपाय आहेत.

वातावरणात बदल झाला किंवा सीझन बदलला की सर्दी खोकला व कफ होणे ही नित्याची बाब झाली आहे. त्याच बरोबर ताप येणे घशात दुखणे किंवा खवखवणे किंवा फ्लू (Flu) होणे. खर म्हणजे सर्दी खोकला मोसम बदलला की होतो. पण प्रतेक वेळी डॉक्टर कडे जाणे जरुरीचे नाही किंवा शक्य होत नाही. कारण की ह्याचा इलाज आपल्या स्वयंपाक घरातील वास्तुमध्ये आपल्याला सापडू शकतो. सर्दी खोकला व ताप आला की भारतामध्ये स्वयंपाक घरातील इंग्रीडिएंट्स वर भरोसा करतात. काही इंग्रीडिएंट्स आपल्या
आरोग्यासाठी लाभदायक सुद्धा आहेत.
आपल्या स्वयंपाक घरात बरेच घरगुती उपाय म्हणजेच नुस्खे (Home Remedies) लपलेल्या आहेत. ज्याचा वापर कौन आपण सर्दी खोकला सारख्या समस्या पासून आराम मिळवू शकतो. त्यासाठी काही राम बाण उपाय आहेत.

सर्दी-खोकला पासून आराम मिळण्यासाठी 10 घरगुती रामबाण उपाय (Home Remedies For Cough):

10 Home Remedies For Cold and Cough
Nani Dadi Ke Nuskhe 10 Home Remedies For Cold and Cough

आल्याचा चहा (Ginger Tea):
भरपूर औषधी गुणधर्म असणारी आदरक की चाय म्हणजेच आल्याचा चहा भारतात घरोघरी बनवला जातो. ज्यांच्या घरी आल घालून चहा ची सुरवात होते व तो पिण्यासाठी जितका स्वादिष्ट आहे तेव्हडेच त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत. त्याच्या सेवनाने सर्दी खोकलाच्या समस्या पासून आराम मिळू शकतो. तसेच वाहणारे नाक बंद होते. व कफ सुद्धा बाहेर पडतो.

आवळाचे सेवन (Amla Consumption):
खोकला साठी आवळा खूप उपयोगी आहे. आवळा मध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात आहे. आवळा ब्लड सर्कुलेशन चांगले करतो त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या खाण्यात शमिल करून आपण एंटी-ऑक्सीडेंट्स चा सोर्स वाढवू शकतो. तसेच आपली इम्यूनिटी पण मजबूत करतो.

मधाचे सेवन (Honey Consumption)
मधाचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो. जे आपल्या आरोग्यासाठी बऱ्याच प्रकारे फायदेमंद आहे. जर कोणाला खूप जास्त प्रमाणात खोकला झाला आहे तर मध व आले सेवन करावे. त्यामुळे सर्दीवर त्याचा लगेच परिणाम होतो.

खोकल्यासाठी रामबाण उपाय तुळशी (Tulsi Home Remedy For Cough)
खोकल्यासाठी तुळस औषधाच्या रूपात सेवन करू शकता. त्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून सेवन करा. टे खूप फायदेमंद आहे. हा रामबाण उपाय खोकला बारा करण्यासाठी उपयोगी आहे.

एलोवेरा (Aloe Vera)
लहान मुलांचा खोकला किंवा मोठ्या माणसांचा खोकला बरा करण्यासाठी एलोवेराचा रस व मध ह्याचे मिश्रण खूप फायदेशीर आहे. खोकल्यावर हा एक रामबाण उपाय आहे.

जवस अलसी (Flaxseed)
जवसचा उपयोग करून आपण सर्दी-खोकला व ताप ह्या परेशानी पासून आपल्याला छुटकारा मिळू शकतो. त्यासाठी आपण जवस पाण्यात घालून ते उकळून घ्या. मग त्यामध्ये लिंबुरस व मध मिक्स करून सेवन करा. त्याच्या सेवनाने आपल्याला आराम मिळू शकेल.

हळदीचे दूध (Turmeric Milk)
हळदीचे दूध ड्राई थ्रोट, म्हणजेच कोरडा खोकला, इन्फेक्शन ह्यासाठी फायदेमंद आहे. त्याच बरोबर आपल्या जेवणात हळदीचा उपयोग केल्यास इम्यूनिटी वाढून कोणते आजार होत नाहीत. एक ग्लास हळदीचे दूध सेवन केल्यावर काही काळातच आपला घसा चांगला होईल.

अॅपल व्हेनिगर (Apple Vinegar)
आपण घरगुती उपाय करण्यासाठी अॅपल व्हेनिगरचा वापर करतो. अॅपल व्हेनिगर खोकल्यावर लाभदायक आहे. एक भाग कच्चे बिना गाळलेले अॅपल व्हेनिगर व दोंन भाग थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोंन पट्ट्या डुबवून त्यामधील दोन्ही पट्ट्या पिळून एक पट्टी डोक्यावर व दुसरी पट्टी पोटावर 10-10 मिनिट ठेवा. मग परत 10 मिनिट झालेकी पट्ट्या बदला. हा उपाय ताप कमी होईपर्यन्त चालू ठेवा.

कोमट पाणी (Lukewarm Water)
सर्दी खोकला झाला की लगेच कोमट पाणी पिण्यास चालू करावे. खर म्हणजे कोमट पाणी सर्दी खोकला व घसा दुखीसाठी आराम दायक आहे. त्यामुळे घशाला आलेली सूज कमी होते. व शरीराला इंफेक्शन होण्या पासून आराम मिळतो.

आल व मीठ (Ginger And Salt)
आल व मीठ ह्याचा एकत्रित उपयोग सर्दी खोकला व तापा पासून आपल्याला आराम देतो. त्यासाठी आले चांगले स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून त्याला मीठ चोळून ठेवा. मग एक एक तुकडा सेवन केल्यास त्याच्या रसा मुले गळा सुटायला लागतो. व मिठानी जंतु सुद्धा मरतात.

टीप: आम्ही येथे जी माहिती दिली आहे ती फक्त आपल्याला माहिती व्हावी म्हणून देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.