Navratri 2022 Shardiya Navratri Muhurat Kalash Sthapana Sahitya W Deviche Wahan In Marathi

Navratri 2022 Shardiya Navratri
Navratri 2022 Shardiya Navratri Muhurat Kalash Sthapana Sahitya W Deviche Wahan

नवरात्री 2022 शारदीय नवरात्री मुहूर्त | पूजा साहित्य | कलश स्थापना | देवीचे वाहन 

26 सप्टेंबर 2022 सोमवार ह्या दिवशी माता दुर्गाचे आगमन होत असून ह्या दिवशी माता दुर्गाची पूजा आराधनाचे पर्व सुरू होत आहे. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे विशेष महत्व आहे. एकूण चार नवरात्री पैकी चैत्र व शारदीय नवरात्री घरा घरात विराजमान होते.

The text Navratri 2022 Shardiya Navratri Muhurat Kalash Sthapana Sahitya W Deviche Wahan in Marathi be seen on our You tube Chanel Navratri 2022 Shardiya Navratri

सोमवार 26 सप्टेंबर ह्या दिवशी माता दुर्गा हत्तीवर विराजमान होणार आहे. आपण नेहमी पहात असाल की माता दुर्गाचे वाहन हे नेहमी सिंह असते. पण नवरात्रीमध्ये प्रतेक वर्षी माता दुर्गा निरनिराळ्या वाहनांवर विराजमान होऊन येते. ज्योतिष शास्त्रा नुसार माता दुर्गाचे वाहन कोणते आहे व त्याचे शुभ अशुभ फळ संकेत काय आहेत हे पाहिले जाते. ह्या वर्षी दुर्गा माता हत्ती वर विराजमान होऊन येत असून विदाई सुद्धा हत्ती बसून होत आहे.

माता दुर्गाचे वाहन महत्व:
ज्योतिष शास्त्रा नुसार जेव्हा माता दुर्गाचे आगमन पृथ्वीवर हत्ती वरुन होते तेव्हा त्याचा शुभ संकेत अश्या प्रकारे मानला जातो. शास्त्रा नुसार हत्ती म्हणजे बुद्धि,ज्ञान व समृद्धिचे प्रतीक मानले जाते. अश्या प्रकारे देशातील जनतेमध्ये बऱ्याच प्रकारचे शुभ संकेत व समृद्धी येण्यासाठी एक इशारा आहे.

जर नवरात्री शुभारंभ सोमवार किंवा रविवार असेल तर माता हत्तीवर बसून पृथ्वीवर येते. जर शनिवार किंवा मंगळवार असेलतर माताचे वाहन घोडा असते. जर गुरुवार किंवा शुक्रवार असेलतर माताचे वाहन डोली असते. व जर बुधवार असेलतर माताचे वाहन नौका असते. ह्या वर्षी 26 सेप्टेंबर 2022 सोमवार ह्या दिवशी शारदीय नवरात्री सुरू होत असून माता हत्तीवर विराजमान होऊन येत आहे तर ते खूप शुभ मानले जाते.

Navratri 2022 Shardiya Navratri
Navratri 2022 Shardiya Navratri Muhurat Kalash Sthapana Sahitya W Deviche Wahan

आता आपण पाहून या कलश स्थपना शुभ मुहूर्त, पूजा साहित्य व पूजेचे महत्व काय आहे.

शारदीय नवरात्री 2022 तिथी:
प्रतिपदा तिथि सुरवात – 26 सप्टेंबर 2022 सकाळी 03 वाजून 22 मिनट
प्रतिपदा तिथि समाप्त – 27 सप्टेंबर 2022 सकाळी 03 वाजून 09 मिनट

कलश स्थापना शुभ मुहूर्त:
वैदिक पंचांग नुसार 26 सप्टेंबर सोमवार देवीची आराधना, पूजा व कलश स्थापना सकाळी 6 वाजून 11 मिनिट पासून सुरू होत असून सकाळी 7 वाजून 51 मिनिट पर्यन्त आहे. जर काही कारण वश ह्या मुहूर्तवर आपल्याला कलश स्थापना करणे शक्य झाले नाहीतर दूसरा मुहूर्त आहे.
अभिजात मुहूर्त सकाळी 11 वाजून 49 मिनिट ते 12 वाजून 37 मिनिट पर्यन्त आहे.

नवरात्र घटस्थापन पूजा साहित्य:
एक चौरंग, त्यावर आसन घालावे, तांब्याचा कलश पाणी भरून किंवा चांदीचा किंवा मातीचा कलश, परात मातीची किंवा बांबूची टोपली,(नसेल तर केळीच्या पानावर मातीचा 2” थर मातीचा करावा) नारळ, हळद-कुंकू, आंब्याची किंवा विडयाची 5 पाने, लाल रंगाचे कापड, लाल दोरा (शुभ कार्यसाठी मनगटावर बांधतात तो) 2 सुपारी (एक सुपारी गणपती म्हणून ठेवण्यासाठी व दुसरी कलशात ठेवण्यासाठी), तांदूळ (अक्षता), अत्तर, नाणी, दूर्वा, हार, फुले, माती (चंगल्या प्रतीची माती), सात धान्य (सातू, तीळ, तांदूळ, मूग, ज्वारी, हरभरा, व गहू ), रांगोळी व रंग, समई व वात, तेल, घंटा देवीसाठी नेवेद्य (जर तुम्हाला सजवायचे असेल तर थाळी भोवती फुलाची आरास करावी.

घटस्थापना किंवा कलश स्थापना कशी करायची:
• पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड घालावे व बाजूनी छान रांगोळी काढून रंग भरावे.
• प्रथम आपण अगदी चांगल्या प्रतीची माती घेऊन चाळून घ्या.मातीचे दोन भाग करून घ्या. एक भाग तसाच ठेवा दुसऱ्या भागात बिया घालून मिक्स करा.
• एक स्टीलची थाळी किंवा परात चौरंगावर ठेवावी त्यामध्ये मातीची थाळी किंवा परडी ठेवावी. मग त्यामध्ये पहिल्या भागाची माती पसरवून त्यावर दुसऱ्या भागाची बिया मिक्स केलेली माती हलक्या हातांनी पसरून घ्या (आजिबात दाबायची नाही). मग थोडेसे पाणी शिंपडायचे.
• आता आपण कलश तयार करायचा आहे. कलश घेऊन वरच्या बाजूला लाल धागा बांधून हळद-कुकु चारही बाजूला लावा. मग त्यामध्ये गंगाजल भरून घ्या. जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. त्यामध्ये सुपारी, अत्तर, दूर्वा, अक्षता, फूल व नाण घाला.
• कलश वरती पाच आंब्याची किंवा विडयाची पाने ठेवा. एक नारळ घेऊन त्याला हळद-कुकु लावावे. मग नारळ कलशावर ठेवावा. कलशावर हळद-कुकु-अक्षता व फूल वाहावे.
• बाजूला समईमध्ये वात लावून तेल घालून बारीक वात लावावी म्हणजे ती जास्त वेळ टिकते ही समई अखंड तेवत ठेवावी.
• रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा, आरती, आराधना करावी व देवीचा मंत्र म्हणावा. रोज कलशाच्या बाजूनी मातीवर पाणी शिंपडावे. रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेला नेवेद्य दाखवावा. रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घालावी.
आता आपण पुढच्या भगामध्ये देवीची 9 रूप त्याचे महत्व काय आहे ते पाहू या.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.