Hanuman Jayanti 2022 Shubh Muhurat Puja Vidhi Mantra Upay And Katha In Marathi

Hanuman Jayanti 2022
Hanuman Jayanti 2022 Shubh Muhurat Puja Vidhi Mantra Upay And Katha VIDEO Katha

हनुमान जयंती 2022 शुभ मुहूर्त पूजा विधी मंत्र व उपाय

श्री राम भक्त हनुमान ह्यांचा जन्म चैत्र पूर्णिमा मंगळवार ह्या दिवशी चित्र नक्षत्र व मेष लग्न ह्या योगावर झाला होता. असे म्हणतात की ह्या दिवशी बजरंग बलीची विधी पूर्वक पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या वर्षी हनुमान जयंती 16 एप्रिल 2022 शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या वर्षी हनुमान जयंती ह्या दिवशी विशेष योग आहे.

धार्मिक मान्यता अनुसार पवन पुत्र हनुमान ह्यांचा जन्म कर्नाटक येथील कोपल जिल्हामध्ये हम्पी ह्या गावात झाला होता. मतंग ऋषि ह्यांच्या आश्रमात त्यांचा जन्म झाला होता. हनुमानजीनच्या जन्माचा उद्देश श्री राम ह्यांचे सहाय करणे हा होता. हनुमान जीनचे 108 नावे आहेत.

The Hanuman Jayanti 2022 Shubh Muhurat Puja Vidhi Mantra Upay And Katha Video In Marathi be seen on our You tube Chanel Hanuman Jayanti 2022

हनुमान जयंती शुभ मुहूर्त:
चैत्र पूर्णिमा शनिवार 16 एप्रिल 2022 रात्री 2:25 प्रारंभ होणार असून रविवार 17 एप्रिल दुपारी 12: 24 मिनिटांनी समाप्ती होणार. ह्या दिवशी हस्त व चित्रा नक्षत्र आहे. हनुमान जयंती सकाळी 5:55 पासून 8:40 मिनिट पर्यन्त रवी योग आहे. रवी योग मध्ये पूजा करणे शुभ मानले जाते. ह्या काळात आपण कोणते सुद्धा शुभ कार्य करू शकता.

हनुमान जयंती ह्या दिवशी पूजा कशी करावी:
हनुमान जयंती ह्या दिवशी संध्याकाळी लाल रंगाचे आसन घालून हनुमानजीनची मूर्ती किंवा फोटो दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. आपण सुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे व बसण्यासाठी लाल रंगाचे आसन ठेवावे. मग तुपाचा दिवा, चंदन अगरबती व धूप लावावे. चमेलीच्या तेल व नारंगी रंग ह्याचा घोळ बनवून नारंगी सिंदूर व चांदीचा वर्क अर्पित करावा. मग लाल रंगाच्या फुलांनी पुष्पांजली द्यावी. लाडू किंवा बुंदीचा भोग अर्पित करावा. केळी सुद्धा प्रसाद म्हणून ठेवावी. तुपाच्या दिव्यानि 9 वेळा ओवाळून आरती करावी. मंत्र जाप करावा.
मंत्र म्हणावा:
ॐ मंगलमूर्ति हनुमते नम:

Hanuman Jayanti 2022
Hanuman Jayanti 2022 Shubh Muhurat Puja Vidhi Mantra Upay And Katha VIDEO Katha

धनप्राप्ती उपाय:
हनुमान पूजा स्त्रिया किंवा पुरुष कोणी सुद्धा करू शकतात. हनुमान जयंती ह्या दिवशी विशेष उपाय केल्यास धनप्राप्ती होते. हनुमान जीना जल अर्पित करून पंचामृत अर्पित करा. तिळाच्या तेलात नारंगी सिंदूर मिक्स करून त्याचा घोळ बनवून अर्पित करा. चमेलीचे तेल अर्पित करा. लाल रंगाचे फूल अर्पित करा. गूळ व गव्हाच्या पिठाचा पदार्थ बनवून त्याचा भोग अर्पित करा. त्याचा बरोबर मंत्र जाप करा.
मंत्र:
श्री राम भक्ताय हनुमते नम:
भगवान विष्णु ह्यांनी राम अवतार घेतला होता त्यांच्या सहयोग साठी संकट मोचन हनुमानजीनचा जन्म झाला होता. माता सीता व रावण ह्याच्या युद्धामध्ये हनुमाननी सहायता केली होती. अंजनी पुत्र हनुमान ह्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हनुमान जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे. ह्या दिवशी धार्मिक कार्य करतात. भक्त उपवास करून हनुमान जीनची पूजा करतात.

हनुमान मंत्र जाप व दोहे
1. नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरन्तर हनुमत बीरा।
असे म्हणतात की जे लोक आजारी आहेत तत्यांना आपल्या रोगा पासून मुक्त होण्यासाठी किंवा त्याच्या त्रासा पासून बचाव करण्यासाठी हा दोहा नियमित म्हणावा. त्यामुळे आपले शरीर बलवान बनते.

मंत्र:
‘विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
असे म्हणतात की हनुमान जीनची कृपा मिळण्यासाठी विद्यार्थी नी ह्या मंत्राचा नियमित जाप करावा त्यांचा शिक्षणात त्याना कामयाबी मिळते.

हनुमान चालीसा वाचनाचे फायदे:
हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमान चालीसा =से वाचन आवश्यक करावे. त्यामुळे आर्थिक चिंता नाहीशी होऊन आपले मनोबल वाढते.

हनुमानजीनची जन्म कथा:
पौराणिक कथा अनुसार आयोध्या नरेश राजा दशरथ हयाणी पुत्रेष्टि हवन केला होता. त्यांनी प्रसाद म्हणून खीर ठेवली होती. व ती खीर आपल्या तिन्ही राणीना सेवन करण्यासाठी दिली होती. तेव्हाच तेथे एक कावळा आला व आपल्या चोचीत खीर घेऊन उडाला. तेव्हा माता अंजनी भगवान शिव ह्यांची तपस्या करीत होती तेव्हा माता अंजनी ह्यांना ती खीर मिळाली त्यांनी ती खीर भगवान शिव ह्यांचा प्रसाद समजून सेवन केली. मग हनुमान जीनचा जन्म झाला. वायुपुत्र भगवान शिव चे दुसरे रुद्रवतार आहे. हनुमान जीना मारुती, अंजनी पुत्र, केसरीनंदन, शंकरसुवन, बजरंगबली, कपिश्रेष्ठ, रामदुत ह्या नावांनी संबोधले जाते.

डिसक्लेमर:
ह्या लेखात दिलेली माहीत ही आपल्या माहिती करिता देत आहे. त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही. ही माहिती विविध माध्यम, ज्योतिष, पंचांग, प्रवचन, ग्रंथ ह्यामधून गोळा करून घेतली आहे. फक्त ही माहिती तुमच्या पर्यन्त पोचवण्याचा हेतु आहे. त्याचा उपयोग करावा की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.