Navratri 2021 Start-End, Muhurat, Samagri, Kalash Sthapana Vidhi, And Nine Rup Information In Marathi

Navratri 2021
Navratri 2021 Muhurth, Puja Vidhi, Samagri And Nine Rup Information

नवरात्रि 2021 आरंभ मुहूर्त, पूजा साहित्य, कलश स्थापना विधि, देवी माताची नऊरूप माहिती 

नवरात्रीचे पर्व दुर्गामाताला समर्पित आहे. चैत्र नवरात्री झाल्यावर लोक शारदीय (Sharad Navratri 2021) नवरात्रीची वाट पाहतात.
पितृ पक्ष संपला की लगेच नवरात्री सुरू होते. हिंदू धर्मामध्ये नवरात्री ह्या सणाला खूप महत्व आहे. दुर्गा माताला शक्तिचे रूप मानले जाते. नवरात्रीच्या अगोदर पूर्ण घराची साफ सफाई केली जाते. मग नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापना करतात नऊ दिवस मनोभावे पूजा अर्चा करतात काहीजण नऊ दिवस उपवास करतात. असे म्हणतात की देवीची मनोभावे पूजा अर्चा केली तर सुख समृद्धी मिळते. प्रथम तिथी पासून दसऱ्या पर्यन्त देवीच्या नऊ रुपाची पूजा करतात.

The Navratri 2021 Start-End, Muhurat, Kalash Sthapana Vidhi, And Nine Rup Information can of be seen on our YouTube Channel Navratri 2021 Start and End Date

नवरात्री मध्ये महाराष्ट्र मध्ये महिला छान नटून जरीच्या साड्या घालून नऊ दिवस भोंडला करतात रोज काहीना काही निराळी खिरापत बनवतात व एक गंमत म्हणून ती खिरापत ओळखायला सांगतात. मध्ये पाटावर हत्तीची प्रतिमा काढून पूजा करून बाजूनी महिला फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात. तसेच गुजरात मध्ये महिला छान तयार होऊन रोज रात्री गरभा म्हणजेच दांडिया खेळतात.

नवरात्री 2021 ह्या वर्षी दुर्गा माताचे वाहन डोली आहे. दुर्गा माता डोलीमध्ये बसून आगमन होणार व डोली मध्ये बसून तिचे प्रस्थान होणार आहे. दुर्गा माताच्या वाहनाला विशेष महत्व असते.

नवरात्री 2021 कधी आहे? दुर्गा पूजा कलश स्थापना कधी आहे 2021?
नवरात्री कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना 7 ऑक्टोबर 2021 गुरुवार ह्या दिवशी आरंभ होत आहे व त्याच दिवसापासून विधीची सुरवात होते.
नवरात्रि 2021 (Navratri 2021 Start and End Date)
नवरात्रि प्रारंभ- 7 अक्टूबर 2021, गुरुवार
नवरात्रि नवमी तिथि- 14 अक्टूबर 2021, गुरुवार
नवरात्रि दशमी तिथि- 15 अक्टूबर 2021, शुक्रवार
घटस्थापना तिथि- 7 अक्टूबर 2021, गुरुवार
घटस्थापना मुहूर्त: सकाळी 06.17 ते सकाळी 07.07 दरम्यान

Navratri 2021
Navratri 2021 Muhurth, Puja Vidhi, Samagri And Nine Rup Information

नवरात्र घटस्थापन पूजा साहित्य:
एक चौरंग, त्यावर आसन घालावे, तांब्याचा कलश पाणी भरून किंवा चांदीचा किंवा मातीचा कलश, परात मातीची किंवा बांबूची टोपली,(नसेल तर केळीच्या पानावर मातीचा 2” थर मातीचा करावा) नारळ, हळद-कुंकू, आंब्याची किंवा विडयाची 5 पाने, लाल रंगाचे कापड, लाल दोरा (शुभ कार्यसाठी मनगटावर बांधतात तो) 2 सुपारी (एक सुपारी गणपती म्हणून ठेवण्यासाठी व दुसरी कलशात ठेवण्यासाठी), तांदूळ (अक्षता), अत्तर, नाणी, दूर्वा, हार, फुले, माती (चंगल्या प्रतीची माती), सात धान्य (सातू, तीळ, तांदूळ, मूग, ज्वारी, हरभरा, व गहू ), रांगोळी व रंग, समई व वात, तेल, घंटा देवीसाठी नेवेद्य (जर तुम्हाला सजवायचे असेल तर थाळी भोवती फुलाची आरास करावी

घटस्थापना किंवा कलश स्थापना कशी करायची:
• पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड घालावे व बाजूनी छान रांगोळी काढून रंग भरावे.
• प्रथम आपण अगदी चांगल्या प्रतीची माती घेऊन चाळून घ्या.मातीचे दोन भाग करून घ्या. एक भाग तसाच ठेवा दुसऱ्या भागात बिया घालून मिक्स करा.
• एक स्टीलची थाळी किंवा परात चौरंगावर ठेवावी त्यामध्ये मातीची थाळी किंवा परडी ठेवावी. मग त्यामध्ये पहिल्या भागाची माती पसरवून त्यावर दुसऱ्या भागाची बिया मिक्स केलेली माती हलक्या हातांनी पसरून घ्या (आजिबात दाबायची नाही). मग थोडेसे पाणी शिंपडायचे.
• आता आपण कलश तयार करायचा आहे. कलश घेऊन वरच्या बाजूला लाल धागा बांधून हळद-कुकु चारही बाजूला लावा. मग त्यामध्ये गंगाजल भरून घ्या. जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. त्यामध्ये सुपारी, अत्तर, दूर्वा, अक्षता, फूल व नाण घाला.
• कलश वरती पाच आंब्याची किंवा विडयाची पाने ठेवा. एक नारळ घेऊन त्याला हळद-कुकु लावावे. मग नारळ कलशावर ठेवावा. कलशावर हळद-कुकु-अक्षता व फूल वाहावे.
• बाजूला समईमध्ये वात लावून तेल घालून बारीक वात लावावी म्हणजे ती जास्त वेळ टिकते ही समई अखंड तेवत ठेवावी.
• रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा, आरती, आराधना करावी व देवीचा मंत्र म्हणावा. रोज कलशाच्या बाजूनी मातीवर पाणी शिंपडावे. रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेला नेवेद्य दाखवावा. रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घालावी.

शरद नवरात्रि देविमाताच्या नऊ रूपांची पूजा:
1) माता शैलपुत्रिची पूजा – पहिला तिथी 7 ऑक्टोबर 2021, गुरुवार
2) माता ब्रह्मचारिणी – द्वितीय तिथि 8 ऑक्टोबर 2021 शुक्रवार
3) माता चंद्रघंटाची पूजा – तृतीया तिथि 9 ऑक्टोबर 2021, शनिवार
४) माता कुष्मांडाची पूजा- चतुर्थी तिथि 9 ऑक्टोबर 2021, शनिवार
५) माता स्कंदमाताची पूजा- पंचमी तिथि 10 ऑक्टोबर 2021, रविवार
६) माता कात्यायनीची पूजा- षष्ठी तिथि 11 ऑक्टोबर 2021, सोमवार
७) माता कालरात्रिची पूजा- सप्तमी तिथि 12 ऑक्टोबर 2021, मंगलवार
8) महागौरीची पूजा- अष्टमी तिथि 13 ऑक्टोबर 2021, बुधवार
9) माता सिद्धिदात्रीची पूजा- नवमी तिथि 14 ऑक्टोबर 2021, गुरुवार
10) शारदीय नवरात्रिच्या व्रताचे पारायण- दशमी तिथि 15 ऑक्टोबर 2021, शुक्रवार शारदीय नवरात्रि चे पारायण व माता दुर्गा चे विसर्जित करतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.