Ganesh Utsav 2021 Shubh Muhurat, Sthapana, Puja Vidhi, Modak & Khirapat in Marathi

Ganesh Chaturthi 2021
Ganpati Utsav Chaturthi 2021 Pooja Muhurat, Sthapana, Lots of Modak Recipes and Khirapat

गणेश उत्सव 2021 शुभ मुहूर्त, स्थापना, पूजाविधी विविध प्रकारचे मोदक व खिरापत

दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या तिथीच्या चतुर्थीला गणेश उत्सव चालू होत आहे. ह्या वर्षी 10 सप्टेंबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी गणेश उत्सव चालू होत आहे. ह्या दिवशी गणपती बाप्पाना आपण वाजत गाजत घरी घेऊन येतो. मग दीड दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस आपण घरी स्थापना करतो. मग शेवटच्या दिवशी धूमधामने आपण त्यांचे विसर्जन करतो.

The Ganesh Utsav 2021 Shubh Muhurat, Sthapana, Puja Vidhi, Modak & Khirapat can of be seen on our YouTube Channel of Ganesh Utsav 2021

तसे पाहिले तर दर महिन्याला चतुर्थी येते तेव्हा आपण पूजा अर्चा उपवास करतो. पण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या तिथीला आपण मोठी गणेश चतुर्थी साजरी करतो. असे म्हणतात की ह्या दिवशी गणेश जीनचा जन्म झाला होता व 10 दिवस आपण त्यांची सेवा करतो.

हरतालिक पूजन गुरुवार 9 सेप्टेंबर 2021 हे व्रत अविवाहित मुली चंगला नवरा म्हणजेच पती मिळवा म्हणून करतात. ह्या दिवशी पार्वती माता म्हणजेच सखी पार्वतीची पूजा अर्चा करतात संपूर्ण दिवस उपवास करतात. व दुसऱ्या दिवशी सोडतात. हरतालिका पूजा कशी करायची ते येथे विडियो मध्ये पाहू शकता.

Ganesh Chaturthi 2021
Ganpati Utsav Chaturthi 2021 Pooja Muhurat, Sthapana, Lots of Modak Recipes and Khirapat

पूर्वीच्या काळा पासून असे म्हणतात की गणपती बाप्पाना घरी आणले की आपल्या घरातील सारी विघ्न निघून जातात. महाराष्ट्रात गणेश उत्सव हा खूप धूम धडाक्यात साजरा करतात. अगदी लांबून लोक गणेशजीनचे दर्शन घायला येतात. मग अनन्त चतुर्दशी ह्या दिवशी वाजत गाजत विसर्जन करतात.

णेशजीनची स्थापना व पूजा कशी करायची ते आपण पाहू या:
गणेश चतुर्थी च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून काही लोकांबरोबर जाऊन गणेश मूर्ती खरेदी करून घरी आणा. पण एक लक्षात ठेवा की गणेश मूर्ती मातीची हवी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलची नसावी. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असलेली शुभ असते त्याच बरोबर सोंड ही वक्राकार असावी. व त्याच्या जवळ त्यांचे वाहन उंदीर असावे. मूर्ती घेतल्यावर एका कापडाने झाकून वाजतगाजत घरी आणावी.

मूर्ती स्‍थापना करण्याच्या वेळी मूर्ती वरील कापड काढून अक्षता घालाव्या मग घरात मूर्ती आणावी. मूर्ती पूर्व किंवा उत्तर-पूर्व ह्या दिशेस चौरंगावर स्थापित करावी. चौकीवर लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कापड घालून मूर्ती ठेवावी. गणेशजिच्या मूर्तीवर गंगाजल शिंपडून जानवे घालावे. मूर्तीच्या डाव्या हाताला अक्षता ठेवून त्यावर कलश ठेवावा. कलश वरती स्वस्तिकचे चिन्ह काढावे. मग आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. मग त्यावर लाल रंगाचा धागा (कलावा) बांधून कलाशवर ठेवावे. मग विधी पूर्वक पूजा करावी.

गणेश पूजा कशी करावी:
स्वच्छ आसनवर बसून प्रथम गणेशजी ना पंचामृतने स्नान घालावे. मग केसर, चंदन, अक्षता, दूर्वा, फूल, दक्षिणा व नेवेद्य दाखवावा. जे पर्यन्त गणपती बाप्पा घरात आहेत तो पर्यन्त घरी गणेश चतुर्थी कथा, गणेश पुराण, गणेश चालीसा, गणेश स्तुति, श्रीगणेश सहस्रनामावली, गणेश आरती, संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणावे. आपल्या श्रद्धे नुसार गणपती मंत्र जाप करावा. रोज सकाळी संध्याकाळी आरती म्हणून नेवेद्य दाखवावा. असे केल्याने घरातील विघ्न दूर होतील.

गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त (Ganesh Chaturthi 2021 Muhuat)
गणेश चतुर्थी शुक्रवार, सप्टेंबर 10, 2021
गणेश पूजा मुहूर्त – 12.17 दुपारी ते रात्री 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त
गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2021 Date) रविवार, सप्टेंबर 19, 2021

हरतालिका व्रत मुलीन करिता पूजा व आरती | Hartalika vrat Puja, Mahiti Aarti For Unmarried Girls

हरतालिका व्रत मुलीन करिता पूजा व आरती येथे क्लिक करून पाहू शकता 

मोदक नानाविध असंख्य प्रकार खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता

मोदक रेसीपी येथे क्लिक करून पाहू शकता  

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.