Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra In Marathi

Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra
Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra

धनत्रयोदशी 2020 मुहूर्त पूजाविधी व लक्ष्मी प्राप्ती मंत्र

Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra In Marathi

हिंदू कॅलेंडर नुसार धनत्रयोदशी ही कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या दिवशी साजरी करतात. धनत्रयोदशी हा दिवस खूप शुभ मानला जातो. ह्या दिवशी काही नवीन खरेदी करतात. खास करून पितळ किंवा चांदीच्या वस्तु खरेदी करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी जी कोणती वस्तु खरेदी करतात ती शुभ मानली जाते. धनत्रयोदशी ह्या दिवशी धनाची वृद्धी होते. ह्या दिवशी लक्ष्मी पूजनचे विशेष महत्व आहे. ह्या वर्षी 13 नव्हेंबर शुक्रवार ह्या दिवशी धनत्रयोदशी आहे. ह्या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी ह्याची विधी पूर्वक पूजा करतात. तसेच ह्या दिवशी सोने, चांदी, आभूषण, भांडी ह्याची खरेदी करतात.

The Marathi language video Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra be seen on our YouTube Channel of: Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra

धनत्रयोदशी पूजा मुहूर्त:
ह्या वर्षी कार्तिक मास कृष्ण पक्ष त्रयोदशी आरंभ 12 नव्हेंबर गुरुवार ह्या दिवशी रात्री 9 वाजून 30 मिनिट चालू होणार असून 13 नव्हेंबर शुक्रवार संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिट पर्यन्त आहे. धनत्रयोदशी पूजा मुहूर्त 5 वाजून 28 मिनिट ते 5 वाजून 59 मिनिट ह्या वेळेत पूजा करायची आहे.

Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra
Dhantrayodashi 2020 Muhurat Puja Vidhi And Mantra

धनत्रयोदशी ह्या दिवशी धन्वंतरी व कुबेर भगवान ह्याची पूजा करतात.
धनत्रयोदशी ह्या दिवशी देवांचे आरोग्य देवता धन्वंतरी व धनाचे देवता कुबेर ह्यांची पूजा करतात. धन्वंतरी हयना भगवान विष्णुचे रूप मानले जाते. त्यांच्या हातात अमृत कलश नेहमी असतो. हयना पितळ हा धातू खूप प्रिय आहे. म्हणून धनत्रयोदशी ह्या दिवशी पितळ ह्या धातूच्या वस्तु खरेदी करतात. तसेच ह्या दिवशी संध्याकाळी दाराच्या बाहेर यमराज ह्याच्यासाठी एक दिवा लावतात. त्यामुळे यमराज खुश होतात व परीवारातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होत नाही.
धनत्रयोदशी ह्या दिवसापासून दिवाळीचे दीवे लावतात. तसेच ह्या दिवशी झाडू खरेदी करतात. झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. ह्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणला की घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

धनत्रयोदशी पूजा विधी:
संध्याकाळी स्वच्छ स्नान करून पूजा करायला बसावे. प्रथम पूजा करायची जागा स्वच्छ करावी त्यावर चौरंग ठेवावा त्यावर गंगाजल शिंपडून लाल किंवा पिवळे वस्त्र घालावे.
चौरंगावर गहू तांदूळ ची रास ठेवावी. मग गणपती, लक्ष्मी, मातीचा हत्ती, भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी ह्याच्या प्रतिमा ठेवाव्या.
सर्वात पहिल्यांदा गणेशजी ची विधी पूर्वक पूजा करावी त्यांना फुले व दूर्वा अर्पण कराव्या. मग हातात अक्षता घेऊन भगवान धन्वंतरी चे ध्यान करावे. मग भगवान भगवान धन्वंतरी ह्यांना पंचामृत ने अभिषेक करून चंदन लावून पिवळ्या रंगाची फुले अर्पित करावी. मग फळे व नेवेद्य अर्पित करावा. मग भगवान धन्वंतरी ह्यांचा मंत्र जाप करून त्याच्या समोर तेलाचा दिवा लावावा. मग आरती म्हणावी व पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी. मग माता लक्ष्मी व भगवान कुबेर ह्याची पूजा करावी. आपल्या मुख्य दरवाजावर दोनी बाजूला तेलाचा दिवा लावावा.

भगवान कुबेर व लक्ष्मी माता मंत्र
धनत्रयोदशी ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप केल्यास अपार ध्यान प्राप्ती होते असे म्हणतात.
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.