Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke  In Marathi

Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke
Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke

अपराजिता फुलांचे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे टोटके 

Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke  In Marathi

The Marathi language video of Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke  can be seen on our YouTube Channel: Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke 

आपण आपल्या घराच्या भोवतालच्या बागेत किंवा बाल्कनीत कुंड्यामद्धे विविध फुलाची झाडे लावतो त्यामुळे शोभा सुद्धा वाढते त्याचे ज्योतिष शास्त्रा नुसार सुद्धा अनेक फायदे आहेत. अपराजिता म्हणजेच मराठीमध्ये गोकर्ण असे म्हणतात. ह्या मध्ये पांढरी किंवा निळ्या रंगाची फुले आहेत. पण निळ्या रंगाच्या फुलाला जास्त महत्व आहे. कारण देवताना अपराजिताचे निळे फूल खूप प्रिय आहे.
ज्योतिष शास्त्रा नुसार अपराजिता फूल भगवान शंकर व शनि देवना अर्पण करून प्रसन्न करा.

Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke
Lakshmi Prapti Sathi Aparajita Fulache Totke

आता सध्याच्या परिस्थितीत सर्वाना आर्थिक नुकसान होत असून आर्थिक नुकसांनाचा सामना करावा लागत आहे. तेव्हा मनोभावे अपराजिता फुलाचा हा सरळ सोपा तोटका करून बघा नक्की तुम्हाला यश मिळेल व आपली आर्थिक प्रगती होईल.

कारण अपराजिता फूल हे शंकर भगवान व शनि देव ह्याना खूप प्रिय आहे. व हा उपाय केला तर आपली किस्मत चमकेल.

अपराजिता फूलाचे तोटके करताना प्रथम अपराजिता ला आव्हान करावे लागते. तोटका करण्याच्या अगोदर पूजेची थाळी घेऊन अपराजिता जवळ जावून तिची पूजा करून मग घरी आणावे मग आपण तोटका करू शकता.

1. जे लोकं आर्थिक तंगी मध्ये आहेत त्यानी फक्त 5 अपराजिता फूल सोमवार व शनिवार ह्या दिवशी नदीमध्ये सोडायची आहेत असे 5 आठवडे करायचे आहे. आपली पैशाची अडचण दूर होईल.

2. जे लोक नोकरीच्या शोधत आहेत किंवा चांगली नोकरी पाहीजे असेल त्यानी सोमवार ह्या दिवशी 6 तुरटीचे तुकडे व 6 अपराजिता फूल दुर्गा मातेला अर्पण करा मग दुसऱ्या दिवशी आपल्या पर्स मध्ये अपराजिता फूलाना ठेवावे. जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यु ला जाणार तेव्हा तेव्हा ह्या फुलांना आपल्या बरोबर घेऊन जावे यश नक्की येईल.

3. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान श्री विष्णु, शंकर भगवान व दुर्गा माता ह्याना निळ्या रंगाची फुले अर्पित करावी. त्यांना ही फुले खूप प्रिय आहेत. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल.

4. ज्याचे विवाह होण्यास अडचणी येत आहेत किंवा वैवाहिक जीवनात मतभेद आहेत त्यानी सुनसान जागी जाऊन अपराजिताची 5 फूल जमिनीत लाकडाच्या वस्तूने खणून त्यात फुले ठेवून माती टाकावी. असे केल्यामुळे शनि दोष दूर होतो.

5. ज्यांचे मंगल ग्रह कमजोर आहे त्यानी सूर्यास्त झाल्यावर श्री हनुमानजिच्या मंदिर मध्ये जाऊन अपराजिता फूल अर्पित करावी त्यामुळे आपल्याला शास्त्रूचा त्रास होत असेल तर होणार नाही.

6.जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल व आपल्याला कोणाची नजर लागली असेल तर शनिवार ह्या दिवशी अपराजिताची फूल पिंपळाच्या झाडाला अर्पित करावी. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ति निघून जाईल.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.