Hanuman Jayanti 2020 Importance, Muhurat and Puja-Vidhi in Marathi

Hanuman Jayanti 2020 Importance, Muhurat and Puja-Vidhi
Hanuman Jayanti 2020

हनुमान जयंती 2020 महत्व | माहिती | मुहूर्त | पूजाविधी विडियो इन मराठी
Hanuman Jayanti 2020 Mathatv Mahiti Muhurath Pujavidhi In Marathi

संकट मोचन अंजनी सुत पवन पुत्र श्री हनुमान ह्याचा जन्म चैत्रमास पोर्णिमा ह्या दिवशी साजरा करतात. श्री हनुमान बजरंगबली आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत. ह्या वर्षी 8 एप्रिल 2020 बुधवार ह्या दिवशी श्री हनुमान जयंती आहे. श्री हनुमान जयंती ह्या दिवशी बजरंगबलीची पुजा अर्चा केली तर आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Hanuman Jayanti 2020 Importance, Muhurat and Puja-Vidhi
Hanuman Jayanti 2020

संकट मोचन श्री हनुमान ह्याची जन्माची गोष्ट आपल्याला माहीत असेलच.
श्री हनुमान हे भगवान भोले शंकरह्यांचा 11 रुद्र आवतार मानला जातो. पौराणिक कहाणी अशी आहे की समुद्र मंथन च्या वेळी अमृत मिळण्यासाठी देव व दानव ह्याच्या मध्ये भांडणे झाली कारण अमृत चे सेवन केलेकी अमरत्व प्राप्त होते. जेव्हा देव व दानव ह्याच्यामध्ये भांडण चालू होते तेव्हा श्री भगवान विष्णु ह्यांनी मोहिनी अप्सराचा अवतार घेतला होता. मोहिनीचे सुंदर रूप बघून देव, दानव व श्री भगवान शंकर सुद्धा मोहित झाले व त्यांनी तेव्हा जे वीर्य त्याग केले ते पवन देव ह्यांनी वानरराज ह्यांची पत्नी अंजना ह्यांच्या गर्भात सोडले. त्याच्याच स्वरुपात अंजनी मातेच्या गर्भातून केसरी नंदन, मारुती संकट मोचन, रामभक्त हनुमान ह्यांचा जन्म झाला.

केसरी नंदन बाल हनुमान कसे बनले श्री हनुमान
बाल हनुमान खूप नटखट होते व त्यांच्या बाल लीला सुद्धा बर्‍याच आहेत. त्यांच्या बाल लीला पैकी एक जग प्रसीद्ध किस्सा आहे. अंजनीमाता आपले सकाळचे काम आटपून बाहेर गेली असताना नटखट बाल हनुमान झोपेतून जागे झाले व त्यांना खूप भूक लागली. तेव्हा त्यांना भुकेमुळे काही सुचेना तेव्हड्यात त्यांनी एका झाडावर एक लाल रंगाचे फळ पाहिले त्यांना ते फळ खूप खावेशे वाटायला लागले. खरम्हणजे ते लाल फळ म्हणजे सूर्यभगवान होते म्हणजे सकाळच्या वेळी सूर्योदय होतो तेव्हा सूर्य भगवान लाल रंगाचे दिसतात. त्या दिवशी अमावास्या होती व राहू त्या दिवशी ग्रहण लावणार होते. ग्रहण लावण्याच्या आतच बाल हनुमान ह्यांनी सूर्याला गिळून टाकले. राहू ह्यांना काय चालले आहे ते समजेना ते इन्द्रभगवान ह्यांच्याकडे मदत मागायला गेले. इन्द्रदेव ह्यांनी बाल हनुमानना खूप विनवणी केली पण बाल हनुमान आईकायला तयार होईनात व सूर्यदेवाला मुक्त करायला तयार होईनात. तेव्हा इन्द्र भगवान खूप चिडले व त्यांनी त्यांच्या हातातील गदाचा उपयोग करून बाल हनुमानच्या तोंडावर जोरदार प्रहार केला तेव्हा बाल हनुमान मुर्शित होवून आकाशातून जमिनीवर पडायला लागले ते पाहून पवन देव भयंकर क्रोधित झाले व त्यांनी मारुतीला घेवून एका गुहेत प्रवेश केला त्यामुळे पृथ्वीवर हवा थांबली त्यामुळे जीवजंतु ह्याचा श्वास थबायला लागला कारकी वार पवन नाही. विनाश होवू नये म्हणजे सर्व देव पवन देवाची प्रार्थना कारला लागले. की आपला क्रोध सोडून पृथ्वीवर प्राणवायू सोडा. तेव्हा प्रतेक देवानी आपल्या कडील दिव्य शक्ति बहाल केल्या व त्यामुळे मारुती या नावावरून हनुमान हे नाव पडले. ह्याचा उलेख श्री हनुमान चालीसा मध्ये तुलसीदास ह्यांनी असा केला आहे.

“जुग सहस्र जोजन पर भानू। लील्यो ताहि मधुर फल जानू।।”

हनुमान जयंती उपवास व पूजा विधी:
हनुमान जयंती ह्या दिवशी उपवास करणे लाभदायक आहे. उपवास करणार असालतर त्याच्या आधल्या दिवसा पासून ब्रह्मचर्यचे पालन करा व रात्री जमिनी वर झोपा त्यामुळे बरेच लाभ मिळतात. सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्तवर उठून आंघोळ करून श्री राम सीता माई व श्री हनुमान ह्याचे नाम स्मरण करा व विधी पूर्वक पुजा अर्चा करा तसेच हनुमान चालीसा व बजरंग बाण ह्याचे वाचन करा. मग श्री हनुमानजी ची आरती म्हणा. हनुमान चालीसा 108 वेळा म्हंटल्यामुळे बरेच लाभ होतात.

पूजेची थाळी बनवतांना थाळीमध्ये भिजवलेले किंवा भाजलेले चणे, गूळ, किंवा बेसन लाडू भोज म्हणून ठेवावा. तसेच हळद कुकु, किशरी चंदन, धूप, अगरबत्ती, निरंजन झेंडू किंवा गुलाबाची फूल लाल किंवा पिवळी फूल अर्पीत करा. ह्या दिवशी श्री हनुमानजींना शेंदूर अर्पीत केला तर आपल्या मनोकामना लगेच पूर्ण होतात.

हनुमान जयंती पर्व तिथि व मुहूर्त 2020
हनुमान जयंती 8 एप्रिल 2020
हनुमान जयंती तिथि – बुधवार, 8 एप्रिल 2020
पूर्णिमा तिथि आरंभ – दुपारी 12:00 (7 एप्रिल 2020)
पूर्णिमा तिथि समाप्त – सकाळी 08:03 (8 एप्रिल 2020)

The Marathi language video of this article on Hanuman Jayanti 2020 can be seen here – Hanuman Jayanti Puja Vidhi and Mahiti in Marathi

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.