Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi

स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळी: पाकातील चंपाकळी ही एक छान गोड डिश आहे ती आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. ही छान चवीस्ट आकर्षक कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आहे तसेच करंजीला एक पर्याय म्हणून सुद्धा मस्त आहे.

चंपाकळी बनवतांना बारीक रवा किंवा मैदा वापरा व पाकामध्ये रंग, वेलचीपूड व लिंबूरस घालून बनवली आहे. चंपाकळीला गावजास सुद्धा म्हणतात. ह्याचा नाजूकपणा आपण पुरी कापण्यावर आवलंबून आहे. पुरीला कट करताना अगदी जवळ जवळ कापून छान मुडपून घेवून तळताना नीट हलवून अलगद तुपामध्ये सोडा म्हणजे ती चान मोकळी होईल व चंपाकळी सुंदर दिसेल.

महाराष्टात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पद्धत आहे तेव्हा रुखवतात ठेवायला सुद्धा छान आहेत किंवा गौरी गणपतीच्या वेळी आरस करून फराळाचे पदार्थ ठेवतात त्यामध्ये सुद्धा अश्या प्रकारचा पदार्थ ठेवता येतो दिसायला सुंदर दिसेल.

स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळीची रेसिपी आमच्या विडीओ च्यानलवर सुद्धा दिलेली आहे त्यासाठी येथे पहा.

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५ बनतात

साहित्य:
२ कप बारीक रवा
१ टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने
तूप चंपाकळी तळण्यासाठी

साखरेच्या पाकासाठी:
१ १/२ कप साखर
१/४ कप पाणी
१ टी स्पून वेलचीपूड
२ थेंब केशरी रंग
१ टी स्पून लिंबूरस

Preparing the Champakali

चंपाकळी बनवतांना

Goad Pakatli Champakali

Sweet Pakatli Kurkurit Champakali

कृती: प्रथम बारीक रवा एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये गरम कडकडीत मोहन व मीठ घालून मिक्स करून घट्ट पीठ मळून एक तास तसेच झाकून बाजूला ठेवा.

पीठ चांगले मुरले की त्याचे एक सारखे गोळे बनवून मोठी पातळ पोळी लाटून एका झाकणाच्या सहायानी छोट्या गोल पुऱ्या कापून घ्या. मग एक पुरी घेवून त्याला मध्ये उभ्या चिरा मारा, पण कडेला पुरी तुटता कामा नये. चिरा मारल्यावर पुरी गुंडाळून कडेला दोनी बाजूनी दाबून घ्या. अश्या प्रकारे सर्व चंपाकळी बनवून ओल्या कापडावर ठेवा, म्हणजे सुकणार नाही.

पाक बनवण्यासाठी जाड बुडाच्या पसरट भांड्यात साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक बनवायला ठेवा. साखर विरघळून झाल्यावर लिंबूरस, वेलचीपूड व रंग घालून मिक्स करून घ्या. पाक घट्ट म्हणजे दोन तारी बनवा. पाक बनत आला की लगेच चंपाकळी बनवायला घेवून पाकात सोडा.

कढईमधे तूप गरम करून घ्या. एक चंपाकळी घेऊन ३/४ चंपाकळी गरम तेलात सोडून हातानी हलवा म्हणजे ती थोडी उलघडेल व छान आकार येईल. सुरवातीला विस्तव मोठा ठेवावा मग चंपाकळी तुपात सोडल्यावर विस्तव मंद करून छान कुरकुरीत गुलाबी रंगावर तळून घ्या. मग पाकात सोडून एक सारखी पाकामध्ये हलवून एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून ठेवा. म्हणजे जास्तीचा पाक निघून जाईल. अश्या प्रकारे सर्व चंपाकळी बनवून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

टीप: पाक थंड झाल्यावर घट्ट झालातर एक टे स्पून पाणी घालून परत गरम करून घ्या.

The Marathi laanguage video of this Sweet and Crispy Champakali for Diwali Faral can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=igdXhdM69zk

About Sujata Nerurkar (2178 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*