Lal Bhoplyachi Kheer Recipe in Marathi

Red Pumkin Kheer
Lal Bhoplyachi Kheer

लाल भोपळ्याची खीर: तांबड्या भोपळ्यालाच हिंदीमध्ये कदु असे म्हणतात. लाल किंवा तांबड्या भोपळ्याची खीर ही आपण स्वीट डीश म्हणून बनवु शकतो. लाल भोपळ्या हा लाभदायक व पिक्तशामक आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्यांना तांबडा भोपळा हितकारक आहे. तसेच ह्याच्या सेवनाने रक्त वाहिन्या आकुचित होतात, पोट चांगले साफ होते, झोप चांगली येते. लाल भोपळा हा फार गुणकारी आहे.

The English language version of the same Kheer recipe can be seen here-  Maharashtrian Red Pumpkin Kheer

बनवण्यासाठी वेळ: २५-३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
१ कप लाल भोपळ्याचा कीस
१/२ लिटर दुध
२ टे स्पून खोया
१/४ कप साखर
४-५ बदाम
४-५ काजू
१ टी स्पून वेलचीपुड
१ टे स्पून तूप

Red Pumkin Kheer
Lal Bhoplyachi Kheer

कृती: तांबडा भोपळा साफ करून धुऊन, त्याची साल काढून किसून घ्या. काजू- बदामाचे पातळ स्लाईस करून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये तांबडा किसलेला भोपळा घालून २-३ मिनिट परतून घ्या. भोपळा शिजला की त्यामध्ये गरम केलेले दुध घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये साखर, वेलचीपूड घालून मिक्स करून उकळी येऊ द्या.
ड्रायफ्रुट नी सजवून गरम किंवा थंड खीर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.