Healthy Alivache Ladoo Recipe in Marathi
अळीवाचे लाडू: अळीव हे पौस्टिक आहेत. त्यामध्ये व्हीटामीन “ए”, “सी” व “इ” आहे. तसेच आयर्न, कॅल्शियम पण आहे. थंडीच्या दिवसात ते फार गुणकारी आहेत. अळीवाचे लाडू चविस्ट लागतात. बनवायला अगदी सोपे व मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. अळीव हे पौस्टिक असल्यामुळे बाळंतीण झालेल्या महिलेला दुध जास्त यावे म्हणून अगदी आवर्जून ह्ळीवाचे लाडू देतात. तसेच कंबर दुखीवर अळीव गुणकारी आहे. पण गरोदर असतांना अळीव खाऊ नये कारण ते उष्ण आहे.
बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २५-३० लाडू बनतात
साहित्य:
२ कप ओला नारळ (खोऊन)
२ टे स्पून अळीव
१ कप गुळ
१/४ कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पूड

Healthy Alivache Ladoo
कृती:
प्रथम अळीव थोडेसे भाजून घेऊन थंड झाल्यावर दुधात २-३ तास भिजवून ठेवा म्हणजे ते चांगले फुलून येतील. नारळ खोऊन घ्या. गुळ चिरून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात खोवलेला नारळ, भिजवलेले अळीव, गुळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर आटायला ठेवा. मिश्रण हळूहळू घट्ट होईल व बाजूनी सुटायला लागेल मग विस्तव बंद करून भांडे उतरवून बाजूला ठेवा, मिश्रण कोमट असतांना लाडू वळून घ्या.
अळीव लाडू दोन दिवसाच्यावर टिकत नाहीत त्यामुळे ते लगेच संपवावे लागतात किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा बनवावे.
Leave a comment