Methi Paneer Roll Recipe in Marathi

मेथी पनीर रोल: मेथी पनीर रोल हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे. मेथी पनीर रोल हा पौस्टिक आहे. मुले मेथीची भाजी खायचा कंटाळा करतात त्यांना अश्या प्रकारचे रोल बनवून दिले तर ते आवडीने खातील. हे रोल बनवतांना मेथीचा पराठा किंवा मेथी ठेपला वापरला आहे व त्यामध्ये पनीरचे सारण भरले आहे. त्यामुळे त्याची चवपण छान लागते.

The English language version of this Methi Rolls recipe can be seen here – Nutritious Methi-Paneer Rolls

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ८ बनतात

साहित्य: आवरणासाठी:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१/२ कप मेथी (चिरून)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१ टे स्पून तेल
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने

सारणासाठी:
२०० ग्राम पनीर
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून मेथी दाणे
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून आले (चिरून)
१ टी स्पून लसून (चिरून)
१/४ कप मेथी (चिरून)
मीठ चवीने
तेल पराठे भाजण्यासाठी
२ चीज क्यूब
१ टी स्पून लाल मिरची पावडर

Methi Paneer Roll for Snacks

Methi Paneer Roll

कृती: मेथीची पाने धुऊन चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.

आवरणासाठी: गव्हाचे पीठ, बेसन, आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली मेथी, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, गरम तेल व मीठ घालून मिक्स करून पीठ मळून घ्या.

सारणासाठी: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मेथी दाणे, कांदा, आले-लसून-हिरवी मिरची मीठ घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये चिरलेली मेथी व पनीर घालून मिक्स करून घ्या.

रोलसाठी: मळलेल्या पीठाचे आठ भाग करा. एक भाग घेऊन चपाती सारखा लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर मेथीचा पराठा भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घेऊन भाजून घ्या.

मग एक पराठा घेऊन त्यावर एक टे स्पून पनीरचे सारण भरून पराठा गुंडाळून घ्या. सर्व पराठे भरून गुंडाळी करून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून सर्व रोल मंद विस्तवावर भाजून घ्या.

गरम गरम पनीर मेथी रोल टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1998 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*