Anda Chicken Kaleji Kalwan Recipe in Marathi

अंडी कलेजी कालवण: अंडी कलेजी कालवण ही मुख्य जेवणात बनवता येईल. ही भाजी बनवतांना अंडी उकडून घेतली आहेत. आपण कलेजी नेहमी फ्राय करून तोंडी लावायला घेतो. त्या आयवजी कलेजीची भाजी बनवली तर छान टेस्टी लागते.

The English language version of this Chicken Liver recipe preparation method can be seen here – Chicken Liver Eggs Gravy

बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
५०० ग्राम चिकन कलेजी
३ अंडी
१ मोठा कांदा (चिरून)
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
मसाल्यासाठी (वाटून घ्यावा):
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून आले (बारीक करून)
१ टे स्पून लसूण (बारीक करून)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून मिरे पावडर
२ लवंग
१/२” दालचीनी तुकडा
२ टे स्पून ओले खोबरे (खोऊन)
२ टे स्पून कोथंबीर’ (चिरून)

Egg Chicken Liver Gravy

Anda Chicken Kaleji Kalwan

कृती: कांदा चिरून घ्या. अंडी उकडून सोलून घ्या. वरील दिलेल्या मसाल्याचे सामान एकत्र करून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. कलेजी धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वाटलेला मसाला लाऊन पाच मिनिट तसेच ठेवा.
कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्या. मग त्यामध्ये मसाला लावलेली कलेजी घालून दोन मिनिट परतून घ्या. परतून झाल्यावर १/४ कप पाणी घालून मंद विस्तवावर कलेजी शिजवून घ्या. कलेजी शिजल्यावर उकडलेल्या अंड्याचे चार भाग कापून शिजलेल्या कलेजीमध्ये घाला. मिक्स करून चांगली उकळी येऊ द्या.
गरम गरम कलेजीचे कालवण चपाती किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1928 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*