Vasu Baras & Rama Ekadashi 2026 | November 5 Vrat Rules, Puja Vidhi, Katha & Shubh Muhurat
वसु बारस व रमा एकादशी 2026 | 5 नोव्हेंबर व्रत नियम, पूजाविधी, कथा व शुभ मुहूर्त
5 नोव्हेंबर वसु बारस व रमा एकादशी 2026 व्रत नियम, पूजाविधी व कथा
वसु बारस व रमा एकादशी हे दोन्ही दिवस एकाच दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी आहेत. वसु बारस व रमा एकादशी हे दोन्ही दिवस हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जातात हे दिवाळीच्या सुरुवातीला आहेत व ते दिवाळी उत्सवाचे प्रतीक मानले जातात. कार्तिक मासमद्धे कृष्ण पक्ष मध्ये हे दिवस खूप कृतज्ञता व कठिन आध्यात्मिक भक्ति चा अनुभूत संगम आहे.
🐄 वसु बारस:
वसु बारस जिला गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस मानतात. ह्या दिवशी गाय व तिचे वासरू ह्यांना सन्मानित करण्यासाठी समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये मातृत्व, प्राचुरता व पृथ्वीची उर्वरता खूप पवित्र प्रतीक मानले जाते.
वसु बारस पूजाविधी:
1. वसु बारस व अनुष्ठान कसे करावे: परिवारातील लोकांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे, गाय व त्याचे वासरू ह्यांना हळद-कुंकू, फुलांचा हार, आभूषण घालून सुंदर सजवा.
2. प्रसाद व अर्पण कसे करावे: श्रद्धालु लोक गाईची आरती करतात व त्यांना मोड आलेले मुग, गहु व बेसनची बनवलेली मिठाई विशेष भोग दाखवून सेवन करायला देतात.
3. वसु बारस व्रत नियम काय आहेत: महिला आपल्या मुलांचे कल्याण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून व्रत करतात. पण ह्या दिवसाचा एक निराळाच नियम आहे तो म्हणजे भक्त दूध, दही, तूप किंवा डेअरीचे कोणते पदार्थ सेवन करायचे नाहीत तसेच तळलेले किंवा गव्हाचे सेवन बिलकुल करायचे नाही. ह्या दिवशी दुधाचे किंवा गव्हाचे किंवा गव्हाच्या पिठाचे कोणतेसुद्धा पदार्थ फक्त गाईला सेवन करायला द्यायचे आहेत.
4. वसु बारसचे व्रत करीत असालतर गुरुवारी संध्याकाळी 5:33 मिनिट ते रात्री 8:10 मिनिट (प्रदोश काळ) मध्ये गाय व त्याच्या वासराची पूजा करून हळद-कुंकू, अक्षता व फूल अर्पित करून पूजा करावी. गाय व वासराला बाजरीची भाकरी, उडीद मोदक किंवा गूळ-चणे नेवेद्य दाखवावा. संध्यायकळी पूजा आरती झाल्यावर जेवण करून व्रत सोडावे.
🕉️ रमा एकादशीकजे महत्व व शुभ मुहूर्त:
माता लक्ष्मी भगवान विष्णु ह्यांची अर्धांगिनी आहे माता लक्ष्मीचे नाव रमा आहे रमा एकादशी ही सर्वात शक्तिशाली व आध्यात्मिक रूपात फलदायी सर्व एकादशी मधील एक एकादशी मानली जाते. असे म्हणतात की रमा एकादशीचे व्रत केल्यास गंभीर पापा पासून मुक्ती मिळते व जीवनात अपार समृद्धी, आंतरिक पवित्रता व अंतत: मोक्ष प्राप्ती होते.
एकादशी तिथी शुभ वेळ मुहूर्त:
एकादशी तिथी आरंभ: 4 नोव्हेंबर 2026 बुधवार सकाळी 11:03 मिनिट पासून
एकादशी तिथी समाप्ती: 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार सकाळी 10:35 मिनिट पर्यन्त
आपण 5 नोव्हेंबर 2026 गुरुवार ह्या दिवशी व्रत ठेवावे करणकी सूर्योदय एकादशी तिथीला आहे.
पारण म्हणजेच व्रत कधी सोडावे: 6 नोव्हेंबर 2026 शुक्रवार सकाळी 6:37 मिनिट पासून 8:48 मिनिट ह्या वेळेत पारण करावे किंवा आपल्या शहरात सूर्योदयच्या अनुसार वेळ पाहून पारण करावे.
रमा एकादशी पूजाविधी व नियम काय आहेत:
रमा एकादशी पूजा भगवान कृष्ण ह्यांचे दामोदर रूप व माता लक्ष्मीला समर्पित आहे.
रमा एकादशी पूजा तयारी व नियम: आध्यात्मिक अनुशासन एकादशी च्या एक दिवस अगोदर सुरू होते. सूर्यास्तच्या अगोदर एकदा सात्विक भोजन केले जाते.
पूजा विधी काय आहे: एकादशी च्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजाची जागा साफ करून घ्या व भगवान विष्णु/कृष्ण व माता लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करा फोटो किंवा मूर्तीला हाल-कुंकू, ताजी फुले, फुलांचा हार, धूप, तुपाचा दिवा व पवित्र तुळशी पत्र अर्पित करा. भक्त पूर्ण दिवस हरे कृष्ण महामंत्रचा जाप व भागवत गीता चे पठन कारवे.
फलाहार उपवासाचे काय खावे: आपण व्रत ठेवणार असाल तर फळ, दूध, मखाना, सुकामेवा व सेंधा नमक घालून साबुदाणा किंवा बटाट्याचे पदार्थ सेवन करू शकता.
काही वर्जित वस्तु खाऊ नयेत: ह्या दिवशी विशेष करून भात, गहु, डाळ, कांदा व लसूण वर्जित आहे. हे नियम परिवारातील अन्य लोकांना सुद्धा लागू होतात जे व्रत करीत नाहीत त्यांना सुद्धा हे नियम लागू आहेत.

📖 व्रत कथा (पौराणिक कहानी)
पुराणा अनुसार, भगवान कृष्ण नी राजा युधिष्ठिरला रमा एकादशीची कहाणी सांगितली होती.
प्राचीन काळात मुचूकंद नावाचा एक परम प्रतापी व धार्मिक राजा होता. त्यांच्या राज्यात प्रतेक व्यक्ति पूर्ण निष्ठा व अनुशासन नी एकादशी व्रत करीत होता. राजाची अत्यंत धर्म परायण पुत्रि चंद्रभागाचा विवाह राजकुमार शोभनसही झाला होता. शोभान शारीरिक रूपानी खूप कमजोर होता तो बराच वेळा तहान-भूक सहन करू शकत नव्हता.
जेव्हा एकदा रमा एकादशी आली त्या दिवशी शोभन आपल्या सासरी होता व राजकीय नियमाला सन्मानित होऊन त्याला सुद्धा व्रत करावे लागते दुर्भाग्य मुळे अत्यधिक शारीरिक कमजोरी मुळे शोभन तहान-भूक सहन करू शकला नाही व त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला.
पण पवित्र एकादशीच्या प्रभावामुळे त्याला मंदराचल पर्वत वर एक अत्यंत भव्य व समृद्ध दिव्य लोक (स्वर्गीय साम्राज्य) प्राप्त झाला. पण त्याचे व्रत कोणत्या सुद्धा श्रद्धाने नव्हते तर मजबूरी मध्ये ठेवले होते. म्हणून त्याचे राज्य अस्थिर व अस्थायी होते.
मग काही वेळा नंतर राजा मुचुकुंद च्या राज्यात एक ब्राह्मण यात्रा करीत एका दिव्य क्षेत्रात पोचला व त्यांनी शोभन ला पाहिले. मग त्यांनी सर्व गोष्ट चंद्रभागाला सांगितली. चंद्रभागा लहानपणा पासूनच एकादशी व्रत करीत होती. आपल्या संचित पुण्य मुळे टी आपल्या पतीच्या जवळ पोचली. चंद्रभागानी आपले अजन्म एकादशी व्रतचे महापुण्य शोभन ला सुपूर्त केले त्याच्या पुण्य प्रभावानी शोभन चे दिव्य साम्राज्य स्थिर, सुंदर व शाश्वत झाले व ते दोघे कायम स्वरूपी आनंदात राहू लागले.
