Kojagiri Purnima 2026: Why Do We Stay Awake All Night? Lakshmi Puja Muhurat & Rituals In Marathi

Kojagiri Purnima 2026
Kojagiri Purnima 2026: Why Do We Stay Awake All Night? Lakshmi Puja Muhurat & Rituals

Kojagiri Purnima 2026: Why Do We Stay Awake All Night? Lakshmi Puja Muhurat & Rituals

कोजागिरी (शरद) पूर्णिमा रात्रभर जागरण का करतात? माता लक्ष्मीशी काय संबंध? महत्व,पूजाविधी मुहूर्त

शरद पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा विशेष महत्वाची मानली जाते. ह्या दिवशी रात्रभर जागरण करण्याची रीत आहे.

हिंदू धर्मामध्ये शरद पूर्णिमाही महत्वपूर्ण मानली जाते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षला जी पूर्णिमा येते तिला शरद पूर्णिमा असे म्हणतात. ह्या दिवसाला कोजागिरी पूर्णिमा, रास पूर्णिमा किंवा कौमुदी व्रत सुद्धा म्हणतात. 25 ऑक्टोबर 2026 रविवार ह्या दिवशी शरद पूर्णिमा आहे. ह्या दिवशी चंद्र 16 कलानी परिपूर्ण होतो. बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतात. असे म्हणतात की शरद पूर्णिमा ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षा होते. ह्या दिवशी चंद्र देवाला खीर भोग म्हणून दाखवतात व रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. पण आपल्याला माहिती आहे का रात्रभर लोक जागरण का करतात? व माता लक्ष्मीचा ह्याच्याशी काय संबंध आहे?

कोजागिरीचा अर्थ काय आहे?
कोजागिरीचा अर्थ संस्कृत मध्ये जागर्ति म्हणजेच कोण जागत आहे. धार्मिक मान्यता अनुसार शरद पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मी रात्री पृथ्वीवर भ्रमण करीत असते व पहात असते की रात्री कोणकोण माता लक्ष्मीची पूजा-अर्चा व आराधना करीत आहे. म्हणूनच शरद पूर्णिमा ह्या रात्री भक्त माता लक्ष्मीची पूजा व भजन कीर्तन करतात.

माता लक्ष्मीचा ह्याच्याशी काय संबंध:
शरद पूर्णिमा ह्या रात्रीला कोजागिरी पूर्णिमा ह्या रूपात सुद्धा साजरे करतात. ह्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा करतात. असे म्हणतात की जी व्यक्ति ह्या रात्री माता लक्ष्मीची पूजा व चंद्र दर्शन करतात त्यांच्या जीवनात माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. शरद पूर्णिमा ह्या दिवशी चंद्राची पूजा व माता लक्ष्मी चे जागरण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-संपत्ति प्राप्त होते.

घरच्या मुख्य दरवाजावर दिवा लावण्याची परंपरा:
शरद पूर्णिमा च्या दिवशी लोक माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा जवळ तुपाचा दिवा लावतात. असे म्हणतात की मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा राहून सुख-समृद्धी व खुशाली येते.

शरद पूर्णिमा पूजन शुभ मुहूर्त:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची निशिता काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ह्या दिवशी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त रात्री 11:40 मिनिट पासून रात्री 12:31 मिनिट पर्यन्त आहे.

शरद पूर्णिमा चंद्रोदय कधी आहे?
शरद पूर्णिमा चंद्र 25 ऑक्टोबर 2026 संध्याकाळी 4:55 मिनिट ला दिसणार आहे. खर म्हणजे वेगवेगळ्या जागी चंद्र दर्शन वेळ वेगवेगळी असणार आहे.

कोजागिरी पूर्णिमा पूजा महत्व:
कोजागिरी पूर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस आहे. जी समृद्धी व सौभाग्यची देवीचे रूप मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी देवी लक्ष्मी माता आपल्या भक्तांच्या जवळ येऊन त्यांना सौभाग्य, धन व समृद्धीचा आशीर्वाद देते. तसेच ह्या दिवशी मंत्र व स्तोत्रचा जाप करणे लाभ दायक होते. देवी माताचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मी माताची पूजा करून श्री सूक्तचे वाचन करा.असे म्हणतात की माता लक्ष्मी पौराणिक समुद्र मंथन मधून प्रकट झाली होती. व त्यांनी भगवान विष्णु ह्यांना आपले पती म्हणून स्वीकारले होते. बरेच लोक शरद पूर्णिमा ह्या दिवशी रात्री जागरण करतात. कारणकी असे म्हणतात रात्री जे भक्त जागे असतात त्यांच्या घरी लक्ष्मी माता येते व त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देते म्हणून रात्रभर भक्त देवी माताची भजन, आरती व स्तुति गात असतात.

कोंजगिरी पूर्णिमा ह्या दिवशी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी घरासमोर सडा रंगोळी काढावी. आपल्या मुख्य दरवाजा पासून ते पुजा घर पर्यन्त लक्ष्मी माताची पावल काढावी. व देवी माताला आपल्या घरी येण्यास प्रार्थना करावी.

चंद्राला खीर दाखवण्याची पद्धत:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी खीर बनवून झाकण न ठेवता काही तास चांदण्यात ठेवा. मग प्रसाद म्हणून सर्वाना द्या. असे म्हणतात की शरद पूर्णिमा च्या दिवशी चंद्र खीरमध्ये अमृत भरते. त्यामुळे खीर एक पौष्टिक व शुभ बनते. खीर ठेवताना चांदीच्या भांड्यात ठेवा कारणकी चांदी हा धातू चंद्राचा धातू आहे. खीर चांदीच्या भांड्यात ठेवण्याची परंपरा आहे. त्यामध्ये चंद्राची थंडक येते. भांड्यावर झकण न ठेवता एक मलमलचे कापड घालून झाकून ठेवा त्यामुळे चंद्राचा प्रकाश त्यामध्ये जाईल व आपली पद्धत सुद्धा पूर्ण हौईल.

Kojagiri Purnima 2026
Kojagiri Purnima 2026: Why Do We Stay Awake All Night? Lakshmi Puja Muhurat & Rituals

आपल्या परिवारात जर खीरमद्धे तुलसी पत्र किंवा थोडासा कापुर घालायची पद्धत असेलतर घाला. खीर प्रथम भोग म्हणून दाखवा मगच वाटा. शरद पूर्णिमाची खीर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सेवन केल्यास शरीराला आराम मिळतो.

कोजागरी लक्ष्मी पूजा विधि:
माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती समोर एक तांब्याचा पाणी भरून कलश ठेवा. कलाशला लाल धागा बांधा व त्यावर कुंकुचा वापर करून एक स्वस्तिक काढा मग पुढे दिलेला मंत्र जाप करून आरती म्हणून प्रसाद दाखवा. लक्ष्मी गणेश यंत्रची पूजा करा. त्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी व धन मिळण्यासाठी मदत होईल. प्रसाद म्हणून आपण खीर किंवा मसाला दूध ठेवू शकता.

मंत्र:
ॐ ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः।।

कोजागिरी ह्या रात्री रात्रभर जागरण करून घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून एक दिवा लावतात घराच्या खिडक्या सुद्धा उघड्या ठेवतात. रात्री भजन कीर्तन करतात.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.