Navratri 2026: Why Is Saptami Celebrated for 2 Days? Ashtami & Navami on the Same Day!
नवरात्री 9 दिवसाची, मग दोन दिवस सप्तमी व एक दिवस अष्टमी-नवमी असे का? योग्य तारीख कोणती?
आता नवरात्री तिथी 11 ऑक्टोबर 2026 रविवार पासून आरंभ झाली असून 20 ऑक्टोबर 2026 मंगळवार ह्या दिवशी दसरा हा सण साजरा करायचा आहे.
नवरात्री मध्ये सप्तमी, अष्टमी व नवमी ही तीन दिवस खूप महत्वाचे मानले जातात. ह्या वर्षी शारदीय नवरात्री मध्ये सप्तमी तिथी दोन सूर्योदय पर्यन्त आहे व अष्टमी-नवमी एकाच दिवशी आहे त्यामुळे तारखे मध्ये थोडासा गोंधळ झाला आहे. 17 ऑक्टोबर शनिवार ह्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करायची आहे. व 19 ऑक्टोबर सोमवार ह्या दिवशी महाअष्टमी व महानवमी दोन्ही पण साजरे करायचे आहेत.
शारदीय नवरात्री मध्ये ह्या वर्षी तिथी च्या मुळे मनात संभ्रम आहे. नवरात्री 11 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून 19 ऑक्टोबर पर्यन्त माता दुर्गाच्या नऊ विविध रूपांची पूजा करायची आहे. पण आपल्याला माहीत आहे हा सप्तमी तिथी दोन सूर्योदय पर्यन्त राहणार असून अष्टमी व नवमी ची पूजा एकाच दिवशी आहे पण तारीख मध्ये बदक झाला आहे. म्हणूनच हिंदू पंचांग मध्ये तिथीची गणना आहे. तिथी व इंग्लिश कॅलेंडर कहा दिवश एक नाही. म्हणूनच एक तिथी दोन दिवस आहे. तर कधी दोन तिथी एक दिवस सुद्धा येतात.
सप्तमी तिथी दोन दिवस का आहे?
ह्या वर्षी सप्तमी तिथी 17 ऑक्टोबर सकाळी सुरू होऊन 18 ऑक्टोबर सकाळी 8:28 मिनिट पर्यन्त आहे. दोन्ही दिवशी सूर्योदयची वेळ सप्तमी तिथी आहे त्यामुळे दोन दिवस साजरी करायची आहे. 17 ऑक्टोबर ला माता कालरात्रीची पूजा करायची आहे. 18 ऑक्टोबर सकाळी 8:28 मिनिट पर्यन्त सप्तमी आहे. मग अष्टमी तिथी सूरी होणार आहे. म्हणूनच नवरात्रीच्या दिवसांची मोजणी व तिथी ची तारीख मध्ये अंतर आहे.
अष्टमी व नवमी एकाच दिवशी का आहे?
अष्टमी तिथी 18 ऑक्टोबर सकाळी 8:28 मिनिट नंतर सुरू होणार आहे. व 19 ऑक्टोबर सकाळी 10:52 मिनिट पर्यन्त आहे. मह नवमी तिथी सुरू होणार आहे. म्हणून 19 ऑक्टोबर ला सकाळी अष्टमी तिथी मग नवमी तिथी सुरू होणार आहे. म्हणूनच 19 ऑक्टोबर ह्या दिवशी महाअष्टमी व महानवमी साजरी करायची आहे.
कन्या पूजन व दसरा कधी आहे?
ह्या वर्षी नवरात्रीची प्रमुख तारीख अश्या प्रकारे आहे.
11 ऑक्टोबर रविवार: घटस्थापना व नवरात्री सुरुवात
17 ऑक्टोबर शनिवार सप्तमी व माता कालरात्रीची पूजा
18 ऑक्टोबर रविवार: सप्तमी तिथी सकाळी 8:28 मिनिट पर्यन्त मग अष्टमी
19 ऑक्टोबर सोमवार: अष्टमी व नवमी दोन्ही तिथी
20 ऑक्टोबर मंगळवार: नवमी तिथी दुपारी 12:50 पर्यन्त आहे.मग दशमी तिथी म्हणजेच दसरा साजरा करायचा आहे.

अष्टमी व नवमी ह्या दिवशी कन्या पूजन करायचे आहे. ह्या वर्षी 19 ऑक्टोबर 2026 सोमवार ह्या दिवशी कन्या पूजन करायचे आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस ह्या वर्षी पूर्ण होणार की नाही?
नवरात्री मध्ये माता दुर्गाच्या नऊ स्वरूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. तिथीचे दोन दिवस पर्यन्त सूर्योदय राहणे व दोन तिथी एकाच दिवशी राहणे म्हणजे कॅलेंडरला प्रभावित करते. म्हणून काही नवरात्रीची महत्व कमी होत नाही. तिथी सूर्योदयच्या वेळी कोणती आहे त्याच्या आधारावर पंचांग पूजाचा दिवस ठरवला जातो.
